Why should we not eat rice at night: आपल्यापैकी अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्ण होत नाही. भारतात भात खाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. भारताच्या ईशान्य आणि दक्षिण भागात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. अनेक लोक बिर्याणी, वरण-भात आणि पुलाव स्वरूपात भात खाणं पसंत करतात. बरेच लोक दिवसातून अनेक वेळा भात खातात. दिवसातून एकदा भात खाल्ल्याशिवाय मनाला शांती मिळू शकत नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. तांदळात विविध जीवनसत्त्वे, कॅलरी, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जस्त असतात. जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. मात्र, रात्री जास्त भात खाल्ल्यानं आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. कारण तांदळात स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. भात सहज पचत असला तरी भातामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी लवकर वाढवते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना रात्री भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. एका क्लिनिकल अभ्यासात असं दिसून आलं की, जास्त भात खाल्ल्यानं टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे पांढऱ्या भाताऐवजी तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता.
- मधुमेहीनी लक्षात ठेवा:तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते हानिकारक आहे. उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न देखील टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढवते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रात्री भात खाऊ नये. तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राइस खाऊ शकता.
- लठ्ठ लोकांसाठी सूचना : भातामध्ये कॅलरीज आणि कर्बोदके जास्त असतात. यामुळे वजन वाढू शकते. वजन कमी करायचं असेल तर रात्री भात खाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
- झोपेची समस्या: भात खाल्ल्यानं शरीरात ट्रिप्टोफॅनची पातळी वाढते. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. परंतु काहींसाठी ही समस्या धोकादायक ठरू शकते. यामुळे त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. शिवाय, भात खाल्ल्यानं झोपेवर परिणाम होण्याची शक्यता असते. कारण शरीरात लगेच ऊर्जा निर्माण होते. झोपेची समस्या असल्यास रात्री भात खाणे टाळावे.
- संधिवाताच्या रुग्णांसाठी: तांदळात संयुगे असतात. ज्यामुळे शरीरात जळजळ वाढू शकते. यामुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात. परिणामी सांधेदुखीच्या रुग्णांनी रात्री भात खाऊ नये.
पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त आरोग्यदायी फायदे देतात. तसंच रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये ३ ते ४ तासांचं अंतर असावे. परिणामी, तुमचे शरीर अन्न चांगले पचवू शकते.
संदर्भ
https://newsinhealth.nih.gov/2010/08/think-twice-before-eating-white-rice