Wash Hands For Healthy Lifestyle: निरोगी जीवन जगण्यासाठी हात धुणे किती महत्त्वाचे आहे, हे कोरोना काळात सर्वांनीच अनुभवलं आहे. तज्ञांच्या मते, हात स्वच्छ धुतल्यानं विविध प्रकारचे जीवाणू विषाणू तसंच जंतूंपासून स्वत:च संरक्षण करता येते. कारण हात स्वच्छ न धुतल्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. 80 टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात. 2017 च्या संसर्गजन्य रोग जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या "हाताची स्वच्छता आणि अतिसार रोग" या अभ्यासात हे उघड झाले. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात, आपण अनेक वस्तूंना स्पर्श करतो आणि हात धुत नाही. कारण ते हानिकारक नाही असं आपल्याला वाटते. परंतु, ते अत्यंत घातक असून त्यामुळे तुम्हाला आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. खाली दिलेल्या 9 वस्तूंना स्पर्श केल्यास हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
- चलनी नोटा: सध्याच्या डिजिटल युगात, कार्ड आणि UPI च्या आगमनानंतरही, चलनी नोटा ही एक गरज आहे. मात्र, नोटा वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तज्ञांच्या मते, नोटांवर अनेक जंतू असतात. न्यू यॉर्कच्या सिटी बँकेनं केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, नोटांमध्ये शेकडो जंतू असतात. ज्यात बॅक्टेरिया, विषाणू आणि प्राण्यांचा डीएनए यांचा समावेश असतो. यामुळे नोटा मोजल्यानंतर हात धुणं फार महत्त्वाचं आहे.
- पेन: आपल्यापैकी बरेच जण फोन आणि संगणक वापरतात, परंतु कधीकधी आपल्याला अचानक पेनची गरज पडते. जेव्हा आपल्याला काही लिहायचे असते किंवा बँकेत जायचे असते तेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांकडून पेन मागतो. मात्र, दुसऱ्याचं पेन वापरल्यानंतर हात चांगली धुवावित, अशी शिफारस केली जाते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अभ्यासात असं स्पष्ठ झालं की, ऑफिस पेनमध्ये टॉयलेट सीटपेक्षा सरासरी 10 टक्के जास्त जंतू असतात. काही लोकांची पेन तोंडात टाकण्याची सवय असते. यामुळे तुम्ही पेन वापरल्यानंतर लगेच हात धुवा. अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता
- सार्वजनिक वाहतूक:न्यू यॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील डॉक्टर केटी बुरिस यांनी, बस आणि ट्रेनसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यानंतर लगेच हात धुण्याची शिफारस केली आहे. एका अभ्यासातून असं दिसून आलं की, प्रवाशांच्या बॅग, शूज आणि चप्पलांमध्ये अनेक जंतू आणि बॅक्टेरिया असतात. प्रवास करून आल्यानंतर लगेच हात पाय स्वच्छ धुतले पाहिजे.
- रेस्टॉरंट मेनू: रेस्टॉरंट्स अशा ठिकाणांपैकी एक आहे, जिथे बॅक्टेरिया आणि विषाणू सर्वात जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे हॉटेलमधील मेनूला हात लावू नका असा सल्ला दिला जातो. अॅरिझोना विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये 1,85,000 बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही चुकून मेनूला स्पर्श केलं तरी, ऑर्डर केल्यानंतर लगेच हात धुण्याचा सल्ला तज्ञ देतात.
- मोबाईल आणि टच स्क्रीन: आजकालच्या आधुनिक युगात, सर्व काही कागदाऐवजी फोनवर अवलंबून आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे. प्रत्येक क्षणाला आपण आपलं फोन बघतो. तज्ञांनी स्पष्ट केलं आहे की असं केल्यानं स्क्रिनवरील अनेक जंतू हाताला लागतात. म्हणून फोन वापरल्यानंतर हात चांगली धुवावीत.
- रुग्णालयातील वस्तू:विविध आजारांनी ग्रासलेले अनेक रुग्ण दररोज रुग्णालयात येतात. यामुळे रुग्णालयाच्या परिसरात भरपूर बॅक्टेरिया आणि विषाणू आढळतात. तज्ञांच्या मते, फक्त एका डॉक्टरच्या पेनवर 46000 जंतू असतात. म्हणूनच रुग्णालयाच्या खुर्च्या, प्रतीक्षालय आणि हँडलना स्पर्श न करण्याचा सल्ला दिला जातो.
- प्राणी:आपल्यापैकी बरेच जण पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर हात धुत नाहीत. परंतु पाळीव प्राण्यांना हात लावल्यांतर हात धुणे गरजेचे आहे. कारण प्राण्यांच्या शरीरावर अनेक जंतू, जीवाणू आणि विविध प्रकारचे विषाणू असतात. यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे.
- कापण्याचे बोर्ड आणि भांडी घासण्याचा स्पंज:स्वयंपाकघरातील कच्च्या अन्नाव्यतिरिक्त, स्वयंपाकाची भांडी, साफसफाईचे स्पंज आणि टॉवेलमध्ये जंतू असतात. एका अभ्यासानुसार, डिशवॉशिंग स्पंजमध्ये 326 प्रकारचे बॅक्टेरिया असल्याचं स्पष्ठ झालय. म्हणूनच हे जास्त काळ वापरू नये असा सल्ला दिला जातो. तसंच वापरल्यानंतर हात धुण्याची शिफारस केली जाते. विशेषतः स्वयंपाक करण्यापूर्वी आणि मांस धुतल्यानंतर.
- साबण आणि हॅड वॉश पंप: आपल्यापैकी बरेच जण बाहेर जाताना वॉशरूममध्ये साबण आणि हॅड वॉश वापरतात. अॅरिझोना विद्यापीठाच्या संशोधनातून असं दिसून आले आहे की अनेक लोकांच्या वापरामुळे शेकडो जंतू त्यावर असतात. म्हणूनच बाहेर साबण आणि हात धुताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)