महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Health Team

Published : 4 hours ago

Updated : 2 hours ago

ETV Bharat / health-and-lifestyle

मेंदू तल्लख ठेवायचा आहे? आजच करा आहारात 'या' घटकांचा समावेश - Foods To Improve Brain Health

Foods To Improve Brain Health: निरोगी जीवन जगण्यासाठी मेंदू तल्लख असणं गरजेचं आहे. अनेक जण मेंदूला तल्लख करण्यासाठी विविध उपाय करतात. एक डाएट प्लान फॉलो केल्यास मेंदू तल्लख होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चला तर जाणून घेऊ यात मेंदूला चालना देण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.

Foods To Improve Brain Health
मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पदार्थ (Getty Images)

Foods To Improve Brain Health:मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू शरीराच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवतो. यामुळे मेंदू तल्लख असणं खूप गरजेचं आहे. मेंदू निरोगी असेल तरच तुम्हीदेखील निरोगी राहू शकता. मेंदूला तल्लख करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे उपाय योजतात. आपण झोपेत असतानासुद्धा आपला मेंदू सतर्क ठेवू शकतो आणि काम करतो हे किती जणांना माहिती आहे? तुम्ही खात असलेल्या अन्नामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात पोषक घटकांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. म्हातारपणात मेंदूची गती मंदावणे स्वाभाविक आहे. यामुळे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश होऊ शकतो. चला तर मग बघू या मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

  • फॅटी मासे :मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड महत्त्वाची भूमिका बजावतो. फॅटी मासे ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. मेंदू 60 टक्के चरबीनं तयार झालेला असतो आणि मेंदूतील 50 टक्के चरबीमध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड असते. ओमेगा -3 मेंदूच्या स्वयं-विकासात आणि पेशी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सॅल्मन, ट्राऊट आणि सार्डिनसारख्या फॅटी माशांचा आहारात समावेश केल्यानं स्मृतिभ्रंश टाळण्यास मदत होते.
  • बेरी : स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी मेंदूला चालना देतात. त्याच्यामधील अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत मिळते. मेंदूची स्मरणशक्ती सुधारण्यासदेखील मदत करते. मेंदूच्या पेशींमधील संवाद सुधारण्यासाठी आहारात बेरींचा समावेश करणंदेखील चांगलं आहे.
  • तृणधान्ये :मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आहारात संपूर्ण धान्य समाविष्ट करणं महत्त्वाचं आहे. तृणधान्यांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतं, जे मेंदूला अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करते.
  • पालेभाज्या : मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी पालेभाज्या खूप फायदेशीर असतात. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्त्वं असतात. जे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात. पालेभाज्यादेखील ल्युटीन आणि फोलेटचा चांगला स्रोत आहेत. जे अल्झायमरला प्रतिबंधित करतात. मेथी, पालक, ब्रोकोली इत्यादी खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.
  • अंडी :अंड्यांमध्ये आवश्यक पोषक घटक असतात. व्हिटॅमिन बी 6, बी 12 आणि फॉलिक अ‍ॅसिडचे भांडार आहे. अंड्याचं दररोज सेवन केल्यानं स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदू संकुचित होण्यापासून संरक्षण मिळते. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये कोलीन असल्यानं ते मेंदूचं कार्य सुधारण्यास मदत करते.
  • संत्री :व्हिटॅमिन सी मेंदूचं आरोग्य सुधारण्यास मदत करते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. संत्र्यांच्या नियमित सेवनामुळे मेंदूच्या पेशींचं संरक्षण करण्यास मदत होते. नैराश्य, चिंता आणि स्किझोफ्रेनिया यांसारख्या मानसिक आजारांचा धोका कमी करण्यासाठीदेखील संत्री चांगली आहेत. संत्र्याव्यतिरिक्त पेरू, किवी, टोमॅटो आणि मिरीमध्येही व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
  • बिया आणि नट : नट आणि बिया मेंदूचं आरोग्य राखण्यास मदत करतात. हे पदार्थ मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. कारण त्यात ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडस् आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असतं. ते व्हिटॅमिन ईने समृद्ध असतात. वृद्धत्वादरम्यान उद्भवणारे ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या आहारात काजू, बदाम, हेझलनट, सूर्यफुलाच्या बिया, अक्रोड इत्यादींचा समावेश करावा.

संदर्भ

https://www.health.harvard.edu/healthbeat/foods-linked-to-better-brainpower

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होऊ शकतात 'हे' आजार? अशी, काढा शरीरातील जीवनसत्त्वाची कमतरता भरून - Immunity Boosting Vitamins
  2. तिशीनंतर निरोगी राहण्याकरिता, महिलांनी करा या 5 पदार्थांचा आहारात समावेश - Diet Plan After 30 For Women
Last Updated : 2 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details