महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

'नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान' राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा का साजरा केला जातो; जाणून घ्या महत्व - Eye Donation Fortnight 2024

Eye Donation Fortnight 2024: नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. परंतु आजही नेत्रदानाबद्दल जनजागृही पाहिजे त्या प्रमाणात झाली नसल्यामुळे अनेक जण संभ्रमात आहेत. अनेकजण भीती आणि गोंधळामुळे नेत्रदान करण्यास घाबरतात.

Eye Donation Fortnight 2024
नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Aug 25, 2024, 6:00 AM IST

हैदराबाद Eye Donation Fortnight 2024 : नेत्रदानाला सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. कारण या दानामुळे अंध जनांना जग पाहण्याची संधी मिळते. इतरांच्या डोळ्यांमुळे मिळालेला प्रकाश हा त्यांच्यासाठी नवीन जीवनासारखा आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात नेत्रदानाबद्दल जनजागृती जनसामान्यामध्ये नाही. भीती आणि गोंधळामुळे लोक नेत्रदान करण्यास घाबरतात. दुसरीकडे ज्यांना नेत्रदान करायंच असतं त्यांना प्रत्यारोपणाशी संबंधित माहिती नसते त्यामुळे माहितीअभावी नेत्रदान करण्यास कुणी समोर येत नाही. नेत्रदानाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी 25 ऑगष्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय 'नेत्रदान पंधरवाडा' साजरा केला जातो. यामागील उद्देश म्हणजे नेत्रदानाविषयी गैरसमज दूर करणे तसंच मृत्यूनंतर नेत्रदान करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

नेत्रदान आणि त्याचं महत्व :दृष्टीची समस्या असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी मृत्यूंनतर कॉर्निया दान करणं याला नेत्रदान म्हणतात. आपल्या डोळ्यांच्या वरच्या बाजूला एक नाजूक थर असतो या थरामुळे डोळ्यांचा पुढचा भाग झाकल्या जातो. डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या दुखापतीमुळे कॉर्नियाचं नुकसान होऊ शकते.

नेत्रदान कोण करु शकतो?

  • एक वर्षावरील प्रत्येक व्यक्ती नेत्रदान कुरू शकतो.
  • बालकापासून वृद्धांपर्यंत कोणतीही व्यक्ती नेत्रदान करु शकते. नेत्रदानासाठी वयाची अट नाही
  • दूरचा किंवा जवळचा चष्मा किंवा जे लोक लेन्सेस घालतात ते सुद्धा नेत्रदान करु शकतात.
  • कर्करोग असणारे व्यक्ती नेत्रदान करु शकतात. कारण कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्या नसतात त्यामुळे कर्करोगग्रस्त लोक नेत्रदान करु शकतात.

नेत्रदान कोण करु शकत नाही : एड्स, हिपॅटायटीस बी किंवा सी, रेबीज, सेप्टिसिमिया, कॉलरा, तीव्र रक्ताचा कर्करोग, तीव्र लुकेमिया, धनुर्वात, एन्सेफलायटीस, टिटॉनस आणि मेंदुज्वर यासारख्या संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त असलेले लोक डोळे दान करू शकत नाहीत.

नेत्रदानाच्या वेळी काय काळजी घ्यावी :मृत व्यक्तीस ज्या खोलीत ठेवलं आहे. त्या खोलीतील पंखा बंद असावा. त्यांचे डोळे बंद करुन डोळ्यावर ओला कापूस अथवा ओला रुमाल ठेवावा आणि डोक्याखाली जाड उशी ठेवावी. डॉक्टरांकडून डेथ सर्टिफिकेट तयार ठेवावा. डोळ्यातील बुब्बळ मृत्यूनंतर सहा तासाच्या आता काढावे लागतात. जरी मृत व्यक्तीनं नेत्रदानाचं इच्छापत्र भरला नसेल तरीही नातेवाईकांना त्या व्यक्तीचे डोळे दान करता येतात. मृत्यूनंतर 6 ते 8 तासात डोळे काढावे लागतात. यात फक्त कॉर्निया काढला जातो. पूर्ण डोळ नाही. त्यामुळे चेहरा विद्रूप होत नाही. पैसे किंवा फी घेतली जात नाही.

नेत्रदानाचा उगम :1905 मध्ये पहिले यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करण्याचे श्रेय डॉ. एडुआर्ड कोनराड झिम यांना जातं, त्यांनी नेत्रपेढी संकल्पनेची सुरुवात केली. नेत्रदान करणारा हा एक शेत कामगार होता ज्याला कोंबड्यांचे घर साफ करताना डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती.

भारतातील पहिले नेत्रदान :1948 मध्ये डॉ. आर.ई.एस. मुथय्या यांनी भारतातील पहिले कॉर्नियल प्रत्यारोपण केले आणि देशातील पहिली नेत्रपेढी स्थापन केली. तेव्हापासून नेत्रदानाची चळवळ सुरू झाली. आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया (EBAI) ही भारतातील नेत्रदान आणि नेत्रपेढीची मुख्य संस्था आहे. या संस्थेमार्फत नेत्रदाणाबद्दल जनजागृती केली जाते.

भारतातील पहिली आय बँक : १९४५ मध्ये डॉ. आर.ई.एस. चेन्नईच्या प्रादेशिक नेत्रविज्ञान संस्थेत भारतातील पहिल्या नेत्रपेढीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासूननेत्र शल्यचिकित्सक आणि नागरी कार्यकर्ते स्थानिक समुदायांमध्ये नेत्रदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहेत. तसंच जगभरात कॉर्निया अंधत्व कमी करण्याच्या उद्देशाने मोठ्या मोहिमा राबवत आहेत.

अधिक माहितकरिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC10565934/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

तुमच्या जिभेचा रंग कोणता आहे? रंगावरून ओळखा शरीरात असणारे आजार - Tongue Color Shows Body Health

उंची, वजन आणि वयानुसार दिवसभरात किती पाणी प्यावं? - How Much Water in a Day

ABOUT THE AUTHOR

...view details