महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

घर-बसल्या अशाप्रकारे तपासा रोगप्रतिकारक शक्ती - SIGNS OF WEAK IMMUNE SYSTEM

Signs Of Weak Immune System: निरोगी जीवन जगण्याकरिता रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे गरजेचं आहे. कारण रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यास अनेक आजारांची लागण होते.

Signs Of Weak Immune System
कमकुवत रोगप्रतिकार शक्तीची लक्षणं (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Nov 13, 2024, 5:24 PM IST

Signs Of Weak Immune System:सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर अनेक आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकानं आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे काय, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल किंवा त्यात काही गडबड असल्यास शरीर विशिष्ट सिग्नल देतो. हे चिन्ह ओळखल्यास आणि वेळेत समस्या सोडण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकता.

  • डॉक्टर काय म्हणतात?नवी दिल्ली येथील लाईफ हॉस्पिटलचे डॉक्टर अशरी कुरैशी यांच्या नुसार, शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. हे आपल्या शरीरातीला व्हायरस, बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक पदार्थांच्या प्रभावापासून दूर ठेवते. कोणत्याही कारणानं रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाली तर गंभीर आजार आणि अपाय होण्याची शक्यता जास्त असते.
  • कमकुवत रोगप्रतिकार शक्तीची लक्षणं
  • वारंवार सर्दी:वारंवार सर्दी, नाक वाहणे ही कमकुवत प्रतिकारशक्तीची लक्षणं आहेत. निरोगी व्यक्तीला वर्षातून 2 ते 3 वेळा सर्दी आणि फ्लू होऊ शकतो. परंतु रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींना वारंवार सर्दी होते.
  • जखमा आणि फोड लवकर बरं होत नाहीत:रोगप्रतिकार शक्ती शरीराचे संक्रमणांपासून संरक्षण करते. वारंवार संसर्ग होणे हे कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षणं आहेत. संक्रमण विविध प्रकारचे असतात. जसे. कानाचा संसर्ग, सायनुसायटिस, फुफ्फुसाचा संसर्ग किंवा मूत्र संसर्ग आदी.
  • थकवा आणि अशक्तपणा जाणवणे: रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यास व्यक्तीला सतत थकवा आणि कमजोरी जाणवते. काम करण्याची इच्छा होत नाही. विश्रांती घेऊन सुद्धा थकवा जाणवतो.
  • पोटाच्या समस्या:पचनसंस्था ही रोगप्रतिकार शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्यास पोटातील चांगले बॅक्टेरिया कमी होतात. परिणामी पोटाच्या समस्या उद्भवू लागतात. बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी आणि गॅसची समस्या ही रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होण्याची चिन्हे आहेत.
  • डॉक्टरांच्या मते तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणं जाणवत असल्यास उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच रोगप्रतिकर शक्ती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करा. याशिवाय योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करून रोगप्रतिकार शक्ती मजबूत करता येवू शकते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. वजन कमी करण्यासाठी नव्हे तर मधुमेहावरही फायदेशीर आहेत रताळे
  2. हृदयविकार टाळू शकतो 'ABCDEF' फॉर्म्युला; एकदा वापरून पहाच
  3. झटपट वजन कमी करण्यासाठी आजच फॉलो करा एक्सपर्ट टिप्स!
  4. मधुमेह आणि हृदयाचे आजार टाळण्यासाठी 'या' हिरव्या भाजीचा आहारात करा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details