मुंबईSummer Skin Care Tips : उन्हाळ्यात घरातून बाहेर पडणं खूपच कठीण काम असतं. कडक सूर्यप्रकाशामुळं आपली त्वचा काळी पडायला सुरवात होते. त्यामुळं उन्हाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. या ऋतूमध्ये धूळ, प्रदूषण आणि घाम यामुळं त्वचा खराब होते. त्यामुळं त्वचेवर टॅनिंग, पिंपल्स आणि कोरडेपणा, तेलकटपणा येतो. उन्हापासून त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या स्किन केअर प्रोडक्ट्सचा अवलंब करतात. तुम्ही घरी बसल्या काही सोप्या टिप्ससह उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. यामुळं तुमची त्वचा नेहमी चमकदार राहण्यास मदत होते. तसंच सूर्याच्या हानिकारक किरणांमुळं त्वचा टॅन होण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळं विलंब न लावता जाणून घेऊया उन्हाळ्यात त्वचेची कशी घ्यावी याबाबत काही टिप्स.
चेहरा धुणे :उन्हाळ्यात, सकाळी उठल्याबरोबर प्रथम थंड किंवा सामान्य पाण्यानं तुम्ही चेहरा धुवा. यामुळं चेहऱ्याच्या त्वचेची रक्ताभिसरण पातळी सुधारेल मदत होईल. तसंच त्वचेवर ताजेपणा दिसून येईल.
उन्हाळ्यात जास्त पाणी प्या : उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळं या ऋतूत जास्तीत जास्त पाणी प्यावं. यामुळं त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तसंच तुम्ही लिंबू पाणी, शरबत, उसाचा रस, फळांचा जूस घ्याला हवा.
रासायनिक उत्पादनांपासून लांब राहवं : उन्हाळ्यात मुरुम येण्याचा धोका खूप जास्त असतो, त्यामुळं या हंगामात रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर करण्याचं टाळायला हवं. त्या ऐवजी तुम्ही फळाची साल चेहऱ्याला लावू शकता.