Food For Diabetes:अस्वस्थ्यकारक जीवनशैलीमुळे खेड्यांपासून शहरांपर्यंत बहुतांश लोक मधुमेहानं त्रस्त आहेत. प्रत्येक घरात मधुमेहाचे रुग्ण आढळतात. पूर्वी केवळ वृद्धांनाच मधुमेह व्हायचा. परंतु, आता तरुणांनाही हा आजार होण्याचे प्रमाण वाढलं आहे. मधुमेही रुग्णांना आपल्या आहारची नेहमी काळजी घ्यावी लागते. कारणं खाण्याचं गणित चूकीलं की, रक्तातील साखर लगेच वाढण्याची शक्यता जास्त असते. यामुळे मधुमेह ग्रस्तांना खाण्याबाबत अनेक पथ्य पाडावी लागतात. अशीच कही फळं आहेत जी मधुमेह रुग्णांसाठी हानिकारक आहेत. जाणून घ्या मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळं खाऊ नयेत?
- केळी:नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी माहितीनुसार, पिकलेल्या केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असते. जे रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. जर तुम्हाला मधुमेह असेल तर आहारात कार्बोहायड्रेट्स किती प्रमाणात घेत आहात. याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण कार्बोहायड्रेट रक्तातील साखरेची पातळी इतर पोषक घटकांपेक्षा जास्त प्रमाणात वाढवते. एका मध्यम पिकलेल्या केळीमध्ये 29 ग्रॅम कर्बोदके आणि 112 कॅलरीज असतात. कार्बोहायड्रेट साखर, स्टार्च आणि फायबरच्या स्वरूपात असतात. जे मधुमेहासाठी हानिकारक असते.
- आंबा: एनसीबीआयच्या म्हणण्यानुसार, मधुमेहाचे रुग्ण मर्यादित प्रमाणात आंबा खाऊ शकतात. जास्त खाणे हानिकारक आहे. कारण आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. कारण आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. तसंच आंब्यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. तसंच, एम्बरचा ग्लायसेमिक इंडेक्स 51 आहे आणि तो मधुमेहासाठी कमी आणि सुरक्षित मानला जातो. सावधगिरी बाळगा, आंबा खाण्यापूर्वी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा आणि आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्या. तेव्हाच आंबा खावे.
- द्राक्षे: मधुमेह असलेल्या लोकांसाठी द्राक्षे फायदेशीर ठरू शकतात. परंतु काही संभाव्य धोके आहेत ज्यांचा विचार केला पाहिजे. द्राक्षांमध्ये नैसर्गिक शर्करा जास्त असते, विशेषतः फ्रक्टोज. त्यामुळे द्राक्षाचं अतिसेवन मधुमेह रुग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. द्राक्षे अधिक खाल्ल्यानं रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. सुकी द्राक्षे म्हणजे मनुका यामध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मनुके मधुमेहींनी खाऊ नये. आहारतज्ञांच्या मते, मधुमेही दररोज द्राक्षे खाऊ शकतात. परंतु 10 किंवा एक कप पेक्षा जास्त नाही. कारण एका कप द्राक्षात २३.२ ग्रॅम साखर असते.
- अननस: तोंडाला अतिशय चविष्ट असणारा अननस मधुमेहींसाठी हानिकारक ठरू शकतो. जरी हे फळ ब्रोमेलेन सारख्या जीवनसत्त्वे आणि एन्झाईम्सने भरपूर असले तरी त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. एक कप चिरलेल्या अननसामध्ये 6 ग्रॅम साखर असते. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल तितक्या प्रमाणात रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना अननस मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
कोणती फळ खावीत?
- संत्रा
- बेरी
- किवी
- सफरचंद
संदर्भ