हैदराबाद Side Effects Of Alcohol :कमी अधिक मद्यपान अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. कार्यक्रम किंवा सन असेल तर यांचा वेगळाच थाट असतो. एवढेच नाही तर अनेक लोकं फॅशन म्हणून दारू पितात. महिला देखील यात मागं नाहीत. अनेकांना दारूमुळे होणाऱ्या परिणामांची परवा नाही. मात्र, दारू शरीरासाठी खरचं घातक आहे, असं नुकत्याच एका अभ्यासात समोर आलं आहे. म्हणून दारू पिऊन बेधुंद होण्यापूर्वी काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा.
दररोज मद्यपान केल्यानं आरोग्याविषयक गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि आयुर्मान देखील कमी होवू शकते. मद्यपान करणाऱ्यांचा लवकर मृत्यू होतो, असं निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आलाय. अभ्यासानुसार दारुच्या अति सेवनामुळे वृद्धांवर विपरीत परिणाम होतो असही सिद्ध झालं आहे.
काय म्हणतो रिसर्च : जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये वृद्ध व्यक्तींमध्ये अल्कोहोल पिण्याचे धोके हायलाइट करण्यात आले आहेत. अल्कोहोलनच्या सेवनामुळे कर्करोग, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित धोका होवू शकतो, असं संशोधनात स्पष्ट झालं आहे. यात कुणी किती दारु पितो हे महत्वाचं नसून संपूर्ण दारुची आरोग्यासाठी हानिकारक आहे असं स्पष्ट झालं आहे. यूके वायोबॅंकमधील 1.35 लाख लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये दररोज मद्यपान केल्यानं 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका वाढतो.
थोडी दारू पिण्याचा कोणताही परिणाम होत नाही असा विचार करणे चूक :अनेकांचा असा गैरसमज आहे की, थोड्या फार प्रमाणात दारू प्यायल्यास आरोग्यावर काही परिणाम होत नाही. हे आरोग्यासाठी चांगलं आहे. थोडी दारू प्यायल्यास दवाईचं काम करते असा काहींचा गोड गैरसमज आहे. परंतु तुम्ही असं विचार करत असाल तर तुम्ही तुमची शुद्ध फसवणूक करत आहात. अभ्यासानुसार असं लक्षात आलं की, दिवसाला थोड्या प्रमाणात देखील दारू प्यायल्यानं गंभीर आरोग्याची समस्या उद्भवू शकते. जे लोक दिवसातून तीनपेक्षा जास्त पॅक घेतात त्यांचामध्ये अकाली मृत्यूचा धोका न प्यायलेल्या लोकांपेक्षा 33 टक्के जास्त आहे. त्याचप्रमाणे, कर्करोगाच्या मृत्यूचा धोका 39 टक्के आणि हृदयविकाराचा धोका 21 टक्के जास्त आहे.
जे लोक दररोज एकापेक्षा कमी पेय पितात ते देखील पूर्णपणे सुरक्षित नाहीत. या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका 11 टक्क्यांनी वाढतो, असं अभ्यासात दिसून आलं आहे. त्यामुळे जे लोक कमी दारू पितात त्यांना आरोग्याच्या समस्या नसतात ही कल्पना या अभ्यासातून चुकीची ठरते. विशेषतः वृद्धांच्या बाबतीत हे खरं आहे.