हैदराबाद Non Dairy Rich Calcium Foods : शरीरातील हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम महत्वाचा घटक आहे. दुग्धजन्य पदार्थांना कॅल्शियम रिच फूड म्हणून ओळखलं जातं. मोनोपॉजदरम्यान आणि डिलिव्हरीनंतर महिलांमधील कॅल्शियमची पातळी खूप कमी होते. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना दूध पिणं आवडत नाही. अशा परिस्थिती आपल्याला नाक मुरडत दूध प्यावं लागतं. परंतु आजच्या लेखात आम्ही तुम्हाला कॅल्शियमयुक्त अशा घटकांची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला दूध न पिता शरीरारील कॅल्शियमचं प्रमाण सुरळीत राखता येईल. चला तर मग त्या कॅल्शियम युक्त घटकांबद्दल जाणून घेऊया.
मोरिंगा किंवा ड्रमस्टिक : प्रसिद्ध पोषणतज्ञ डॉ. अंजली यांच्या मते, ज्यांना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाहीत त्यांनी मोरिंगा पाउडर किंवा ड्रमस्टिक(शेवग्याच्या शेंगा) सेवन करणं फायदेशीर आहे. मोरिंगामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
नाचणी :जर तुम्हाला दूध आवडत नसेल, तर तुमच्या आहारात नाचणीचा समावेश करून तुम्ही पुरेसे कॅल्शियम मिळवू शकता. 100 ग्रॅम नाचणीमध्ये 300 मिलीग्राम कॅल्शियम असते. नाचणीच्या सेवनामुळे शरीराला (नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन अहवाल) मुबलक प्रमाणात कॅल्शियम मिळतो. यामुळे हाडं मजबूत राहतात.
भोपळ्याच्या बिया : जर तुम्ही गुडघे आणि सांधेदुखीनं त्रस्त असाल तर भोपळ्याच्या बियांचं सेवन फायदेशीर मानलं जातं. ज्या लोकांना दूध आवडत नाही त्यांनी आपल्या आहारात त्याचा समावेश केल्यास त्यांना अधिक कॅल्शियम मिळेल आणि त्यामुळे हाडांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल.