महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

नवरात्रीचा पाचवा दिवस : आकर्षक दिसण्यासाठी फॅालो करा ‘हे’ लूक - Navratri 2024 - NAVRATRI 2024

Navratri Day 5 Colour :आज नवरात्रीचा पाचवा दिवस, आजचा खास रंग पिवळा आहे. त्यामुळे तुम्ही सेलिब्रिटींचे हे लूक फॉलो करू शकता.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 7, 2024, 2:56 PM IST

Navratri Day 5 Colour : आज नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस असून दुर्गा देवीच्या नऊ रुपांपैकी स्कंदमातेला हा दिवस समर्पित असतो. स्कंदमाता या सुख-समृद्धीच्या दैवत आहेत. पिवळा रंग त्यांचा सर्वात आवडीचा रंग असल्याची मान्यता आहे. यामुळं आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रं घालण्याची परंपरा आहे. ही वस्त्र परिधान करताना आपण सर्वात हटके दिसावेत म्हणून बॅालिवूड अभिनेत्रींशी इन्सपायर होऊन काही आयडिया तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे तुमच्या सौंदर्याला चार चांद लावेल.

  • श्रद्धा कपूरचा पिवळ्या साडीतील लूक :जर तुम्ही नवरात्रीच्या काळात आकर्षक लूक शोधत असाल तर तुम्ही स्वत:ला श्रद्धा कपूरसारखा आकर्षक लूक देऊ शकता. पिवळ्या साडीवर आकर्षित बांगड्या आणि हातात पोटली बॅग असलेला हा साधा लूक तुमचे सौंदर्य अधिक खुलवेल.
श्रद्धा कपूरचा पिवळ्या साडीत लूक (Instagram)
  • कियारा अडवाणीचा पिवळा शरारा लूक : नवरात्रीत तुम्हाला वेगळा लूक हवा असेल तर, कियारा अडवाणीचा पिवळा शरारा आणि जॅकेट लूक नवरात्रीदरम्यान तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
कियारा अडवाणीचा पिवळा शरारा लूक (Instagram)
  • तृप्ती डिमरीचा एथनिक लूक :अभिनेत्री तृप्ती डिमरीने परिधान केलेल्या साडीचा हा एथनिक लूक. या नवरात्रीत घालण्यासाठी एक वेगळा पर्याय असू शकतो.
तृप्ती डिमरीचा एथनिक लूक (Instagram)
  • सारा अली खानचा उत्कृष्ट लेहेंगा लूक: नवरात्रीमध्ये लहेंगा कपड्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असतो. गरब्यामध्ये पिवळा लेहेंगा आणि पारंपारिक दागिणे घातलेला सारा आली खानचा लूक तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
सारा अली खानचा उत्कृष्ट लेहेंगा लूक (Instagram)
  • आलिया भट्टचा ऑर्गन्झा साडी लूक:आलिया भट्टने गळ्यात चोकर घालून परिधान केलेली ही उत्कृष्ट पिवळी ऑर्गेन्झा साडी उत्तम पर्याय असू शकते. तुमच्याकडे देखील अशी साडी असल्यास तुम्ही आलियासारखा लूक करू शकता.
आलिया भट्टचा ऑर्गन्झा साडी लूक (Instagram)
  • माधुरी दीक्षितच्या मिरर वर्क साडीतील लूक : माधुरी दीक्षितनं मिरर वर्क असलेली पिवळी साडी नेसली आहे. तुम्ही देखील माधुरीसारखा सिंम्पल लूक करून आकर्षणाचा केंद्रबिंदू होवू शकता.
माधुरी दीक्षितचा मीर वर्क साडीतील लूक (Instagram)

ABOUT THE AUTHOR

...view details