Morning Walk Vs Evening Walk: चालणे किंवा जॉगिंग हे वजन कमी करण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे. तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे ते पूर्णपणे मोफत आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही जिममध्ये जाण्याची गरज नाही आणि एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. लोक सहसा सकाळी लवकर फिरायला जाणे पसंत करतात. मात्र, अनेकांना संध्याकाळी फिरायला जायला आवडते. परंतु, प्रश्न असा उद्भवतो की, कोणत्या वेळी चालणे वजन कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर आहे, तर चला जाणून घेऊया...
- सकाळी फिरण्याचे फायदे
- मूड सुधारतो: सकाळी चालण्याचे शारीरिक फायद्यासोबत मानसिक फायदे देखील आहेत. सकाळी चालल्यामुळे मूड सुधारतो, ताण कमी होते. चिंता दूर होतात, थकवा कमी जावणवते तसंच नैराश्यासारखी लक्षणं किंवा नैराश्याचा धोका कमी करण्यासाठी हे उत्तम आहे. यासाठी आठवड्यातून किमान 5 दिवस 20 ते 30 मिनिटं चालण्याचा प्रयत्न करा.
- आरोग्याची स्थिती सुधारते: सकाळी चालल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. जे विविध आजारांपासून आपले संरक्षण करू शकते. काही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, दररोज 30 मिनिटे चालल्याने हृदयरोगाचा धोका 19 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. जर तुम्हाला मधुमेह असेल तर सकाळी चालल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
- स्नायू मजबूत होतात: मॉर्निंग वॉकमुळे तुमच्या पायांचे स्नायू बळकट होऊ शकतात. सर्वोत्तम परिणामांसाठी, मध्यम ते जलद गतीने चाला. यासाठी, तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करू शकता, जसे की पायऱ्या चढणे, टेकड्या चढणे आणि उतरणे किंवा ट्रेडमिलवर उतारावर चालणे. तुमचे स्नायू बळकट करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून अनेक वेळा स्क्वॅट्स आणि लंग्जसारखे पाय मजबूत करणारे व्यायाम देखील करू शकता.
- कॅलरी बर्न करण्यासाठी उत्तम: इतर कोणत्याही शारीरिक व्यायामाप्रमाणे चालल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. जर्नल ऑफ डायबिटीज केअरमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार सकाळी केलेल्या व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होतेत तसंच आरोग्यविषयक अनेक समस्यांपासून देखील संरक्षण होते.
- संध्याकाळी फिरण्याचे फायदे
- रात्रीची झोप सुधारते: तणाव आणि चिंतेमुळे तरुणांमध्ये झोपेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. कमी किंवा अपूर्ण झोप तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. दररोज सायंकाळी चालल्यानं मन फ्रेश होते. तसंच तुमचा ताण देखील कमी होतो. तसंच सायंकाळी चालल्यानं रात्री झोप व्यवस्थित होते.
- पाठदुखीमध्ये फायदेशीर:ऑफिसमध्ये दिवसभर संगणकासमोर बसल्याने तुमच्या पाठीचा पोश्चर बिघडू शकतो, ज्यामुळे पाठीच्या समस्या उद्भवू शकतात. तज्ञांचं म्हणणे आहे की आजकाल अनेक तरुणांना पाठदुखीचा त्रास होत आहे, त्यामुळे संध्याकाळी फिरायला गेल्याने तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात होणारा ताण आणि जडपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
- वजन कमी करण्यासाठी कोणता वेळ सर्वात जास्त उपयुक्त आहे
झाशी मेडिकल कॉलेजचे डॉ. कुलदीप चंदेल यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक दोन्हीचे स्वतःचे फायदे आहेत, परंतु जेव्हा चालण्याद्वारे तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय गाठण्याचा विचार येतो तेव्हा तुम्ही कोणता वेळ निवडता हे तुमच्यावर अवलंबून असते. सकाळ आणि संध्याकाळ चालण्याचे वजन कमी करण्यात लक्षणीय फायदे आहेत, परंतु दोन्हीची प्रभावीता मुख्यत्वे ते तुमच्या दिनचर्येत किती चांगले बसते आणि तुमचे शरीर त्याला कसा प्रतिसाद देते यावर अवलंबून असते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ