हैदराबाद Sharing Bed With Pet Animal :प्राणी प्रेमी नेहमीच प्राण्यांचे आधिक लाड करतात. तर कधीकधी पाळीव प्राणी त्यांना जिभेने चाटतात. ज्या लोकांना कुत्रे-मांजर आवडतात, त्यांच्यासाठी हे सामान्य आहे. याकडं पाळीव प्राण्याचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत म्हणून पाहिलं जातं. परंतु पाळीव प्राण्यांना किस केल्याने मानवाला अनेक प्रकारच्या संक्रमणाचा धोका असू शकतो. तसेच पाळीव प्राण्यांसह रात्री बेड शेअर शेअर केल्याने देखील तुमच्या आरोग्याला धोका होवू शकतो.
मानवी आरोग्यास धोका :तुम्ही रात्री झोपल्यावर तुमचा मांजर किंवा कुत्रा तुमच्या पलंगावर येऊन झोपत असेल. परंतु प्राण्यासाठी ही जागा याेग्य आहे का? जर तुम्ही तुमचा बेड तुमच्या पाळीव प्राण्यासोबत शेअर करत असाल तर सावधान. यामुळं आरोग्यावर परिणाम होवू शकतो. एका संशोधनात असं दिसून आलं आहे की, अंदाजे 90 टक्के युरोपियन कुटुंबांमध्ये किमान एक तरी पाळीव प्राणी आहे. 45 टक्के कुत्रे आणि 60 टक्के मांजरींना बेडवर झोपण्यासाठी तेथे परवानगी आहे. तर 18 टक्के कुत्री आणि 30 टक्के मांजरी हे मालकासह बेडवर झोपतात. पाळीव प्राण्यासोबत खेळणं हे आनंददायक असलं तरी, यामुळं मानवी आरोग्यास धोका होऊ शकतो.