महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

वजन आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारीची भाकरी फायदेशीर? - Jowar Roti - JOWAR ROTI

Jowar Roti : निरोगी राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी तसंच मधुमेह नियंत्रणात ठेवण्याकरिता आहारात ज्वारीची भाकर खाणं चांगलं आहे. चला जाणून घेऊया रोज ज्वारीची भाकरी खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे होतात?

Jowar Roti
ज्वारीची भाकर खाण्याचे फायदे (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Sep 16, 2024, 5:17 PM IST

Updated : Sep 16, 2024, 6:16 PM IST

हैदराबाद Jowar Roti: सध्या लोकं कोणत्या गोष्टीनं परेशान असतील तर ते म्हणजे वाढलेलं वजन. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कित्येक जण जीमध्ये जाऊन घाम गाळतात. एवढेच नाही तर तऱ्हे-तऱ्हेचे डाएट प्लान फॅालो करतात. मात्र, पाहिजे तसा परिणाम मिळत नाही. वाढत्या वजनासोबतच अनेक आजार देखील शरीरात प्रवेश करतात. त्यापैकी एक आहे मधुमेह. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी बरेच लोक रात्री भात खाण्याऐवजी चपाती किंवा भाकरी खातात.अलीकडे ज्वारीची भाकर खाल्ल्यानं मधुमेह नियंत्रीत राहातो, असं तज्ज्ञांच म्हणणं आहे. त्यामुळे आता ज्वारीला मागणी वाढली आहे. परंतु खरंच ज्वारीची भाकरी फायदेशीर आहे का?

अभ्यासानुसार:नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या टीमने ज्वारीची भाकरी खाल्ल्यास काय होते याचं मुल्यमापण केलं आहे. ज्वारीमध्ये आरोग्यास प्रोत्साहन देणारी अनेक पोषक तत्वे आहेत. तसंच अँटिऑक्सिडंट फिनोलिक संयुगे इतर धान्यांच्या तुलनेत जास्त असतात, असं या अभ्यासात आढळून आलं आहे. ज्वारीची भाकर पचनक्रिया सुधारते आणि आजारांचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.

ज्वारीचत असलेले पोषक घटक: ज्वारीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, बी1, बी2, बी3, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे स्नायू मजबूत होतात. पोषक तत्वांमुळे त्वचा निरोगी राहते. ज्वारीच्या भाकरीमध्ये किंवा चपातीमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले लोह भरपूर प्रमाणात असते, असही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हाडं मजबूत होतात: ज्वारीच्या भाकरीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखे खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे हाडं तर मजबूत होतात शिवाय दातासंबंधित समस्या देखील कमी होते.

कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले धान्य: ज्वारी हे गव्हापेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले धान्य आहे. मधुमेहाचा त्रास असलेले लोक रक्तातील साखरेची पातळी हळूहळू आणि स्थिरपणे वाढवण्यासाठी ज्वारीची भाकर किंवा चपाती खातात. 2017 मध्ये 'जर्नल ऑफ न्यूट्रिशन अँड मेटाबोलिझम'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ज्वारीची भाकर किंवा चपाती खाल्ल्यानं टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियानाचे कुमार यांनी एका अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे.

ज्वारीची भाकर किंवा चपाती खाण्याचे फायदे

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • ज्वारीच्या भाकरीमध्ये असलेले फायबर स्नायू मजबूत करते आणि पचनक्रिया सुधारते.
  • ज्वारीच्या दोन भाकरी किंवा चपाती खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते. ज्याना वजन कमी करायचे आहे, त्यांनी ज्वारीची भाकर खाल्ल्यास चांगला परिणाम होतो.
  • ज्वारीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
  • ज्वारीमुळे कोलेस्टेरॉलही कमी होतो आणि हृदय निरोगी राहतं.
  • म्हणूनच ज्वारीच्या रोटीला तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

यात दिलेली माहिती खाली दिलेल्या वेबसाइटवरून घेतले आहे.

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33336966/

हेही वाचा

  1. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी 'हे' सोपे व्यायाम रामबाण - मधुमेह राहील नियंत्रणात! - Exercises for Diabetes
  2. जेवणानंतर बडीशेप खाणं कितपत सुरक्षित? - Health Benefits Of Fennel
Last Updated : Sep 16, 2024, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details