How To Pink Lips Naturally:ओठांचं सौंदर्य खुलावं म्हणून बाजारात विविध लिपस्टिक उपलब्ध आहेत. मोठ-मोठे सेलिब्रिटी तर चक्क ओठांची सर्जरी करतात. तरीही हवामानातील बदल, लिपस्टिकचा अतिवापर, कॉफी-चहाचं अतिसेवन आणि धुम्रपानामुळे ओठ काळे पडतात. ओठांचा काळेपना लपवण्यासाठी बरेच लोर ब्युटी ट्रीटमेंट देखील घेतात. परंतु हा कायमचा उपाय नाही. तुम्ही देखील ओठांच्या या समस्येनं त्रस्त आहात? तुम्हालाही गुलाबी ओठ हवे आहेत? तर खाली दिलेले घरगुती उपायांचा आजच अवलंब करा आणि मिळवा गुलाबासारखे गुलाबी ओठ.
- बीटरूट, डाळिंब आणि कोथिंबीर : ओठांवरचे काळे डाग दूर करण्यासाठी बीटरूटचा रस, डाळिंबाचा लगदा आणि कोथिंबिरीचा रस एकत्र मिसळा. हे मिश्रण ओठांवर लावल्यास काळा रंग निघून जाण्यास मदत होईल, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- मध, लिंबाचा रस, ग्लिसरीन : एका बाऊलमध्ये मध, लिंबाचा रस आणि ग्लिसरीन घ्या. हे घटक चांगले मिसळा आणि ओठांवर लावा. ओठांवरचा काळा रंग कमी करण्यासाठी हे चांगले आहे.
- हळद आणि दुध :एका बाऊलमध्ये चिमुटभर हळद आणि एक चमचा दुध मिसळा. हे मिश्रण ओठांवर लावा आणि काही वेळानंतर धुवा. नियमित पणे असं केल्यास ओठांचा काळेपणा दूर होईल.
- गुलाब जल :हायपर पिग्मेंटेशन कमी करण्यास गुलाब जल उपयुक्त आहे. कापसाच्या सहाय्याने ओठांवर गुलाब जल लावा आणि काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचे ओठ गुलाबी होतील.
- खोबऱ्याच तेल: ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी नारळाचं तेल फायदेशीर आहे. हा उपाय नियमित केल्यास ओठांना नॅचरल गुलाबी रंग येतो.
- एक्सफोलिएशन :तुम्हाला कधी ओठ स्क्रब करावंसं वाटलं आहे का? तज्ज्ञ त्वचा स्क्रब करण्याऐवजी 'एक्सफोलिएशन' करण्याचा सल्ला देतात. याचा अर्थ मऊ ब्रिस्टल ब्रश घ्या. ओठ थोडेसे ओले करा आणि नंतर ब्रशने ओठांवर चोळा. त्यानंतर लिप बाम लावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी असं केल्यास तुमचे ओठ सुंदर होतील, असं तज्ञ सांगतात.
- निरोगी आहार : ओठांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्या आहारात भरपूर फळांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. खजूर हे ओठांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. खजूर पाण्यात भिजवून सेवन करणे देखील चांगले आहे. यासाठी सहा खजूर एक कप पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवावेत. ते पाणी प्यायल्यानं तुमचे ओठ निरोगी राहतील, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- सूर्यप्रकाशापासून संरक्षण : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ओठ काळे होण्याचं एक कारण सूर्यप्रकाश देखील आहे. त्यामुळे उन्हापासून ओठांचे रक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. उन्हात जाताना सनस्क्रीन लोशन वापरावं. जास्त सूर्यप्रकाश असेल तेव्हा बाहेर पडणं टाळा. तसेच, बाहेर जावेच लागले तर ओठ काळे होऊ नयेत म्हणून स्कार्फ वापरा, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.