महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

डाळिंबाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे - BENEFITS OF POMEGRANATE

रोज सकाळी ज्यूस प्यायल्यास आरोग्यविषयक अनेक फायदे होतात. परंतु, असे काही फळं आहेत ज्याचा ज्यूस आरोग्यवर्धकापेक्षा कमी नाही. वाचा सविस्तर...

Benefits Of Pomegranate Juice
डाळिंब ज्यूस (Getty Images)

By ETV Bharat Health Team

Published : Nov 29, 2024, 5:23 PM IST

Updated : Nov 30, 2024, 9:41 AM IST

Benefits Of Pomegranate Juice: ज्यूस, फळांचा असो वा हिरव्या भाज्यांचा प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत. एखाद्या फळाचे रस प्यायल्यास तुम्हाला त्वरीत ताजेतवाने झाल्यासारखं वाटते. असाच एक फळं आहे, ज्याचा ज्यूस तुम्ही प्यायल्यास रक्त वाढते शिवाय अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तो म्हणजे डाळिंब. डाळिंबाचा ज्यूस दाहक-विरोधी गुणांनी समृद्ध आहे. तसंच यात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर पुरेशा प्रमाणात आढळतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसंच कर्करोगापासून संरक्षण होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सोबतच भूक वाढविण्यासाठी देखील डाळिंबाचा ज्यूस फायदेशीर आहे.

  • वजन कमी करण्यासाठी फायदेशीर:ज्यांना वजन कमी करायचं आहे. त्यांनी नियमित डाळिंबाचा ज्यूस प्यावा. डाळिंबामध्ये आढळणारे घटक चरबी जाळण्यासाठी फायदेशीर आहेत. तसंच यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पॉली फेनॉल सारखे पोषक तत्व चयापचय सुरळीत करते. याच्या नियमित सेवनानं भूक कमी होते तसंच जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करण्यास डाळिंब फायदेशीर आहे.
  • ग्लोइंग स्किन:दररोजच्या प्रदूषणामुळे त्वचेचे नुकसान होते. परंतु डाळिंबाच्या ज्यूसच्या सेवनानं त्वचेची चमक टिकून राहते. तसंच अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी डाळिंबाचे ज्युस फायदेशीर आहे.
  • कर्करोगावर उत्तम:डाळिंबामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत होते. काही संशोधनात असं आढळून आलं की, डाळिंबाच्या नितमित सेवनामुळे स्तन, प्रोस्टेट तसंच फुफ्फुसासारख्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
  • बद्धकोष्ठता करते दूर:डाळिंबाचा ज्यूस नियमित प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होते. तसंच ब्लोटिंग, गॅस, बद्धकोष्ठता आणि सूज यासारख्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठचा मूळापासून दूर करण्यासाठी दररोज सकाळी एक वाटी डाळिंबाचं सेवन करावं.
  • हृदयाचं आरोग्य सुधारतं: डाळिंबाच्या नियमित सेवनानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहते. डाळिंबातील पोषक घटकामुळे रक्तदाब नियंत्रित राहते त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
  • बद्धकोष्ठता करते दूर:डाळिंबाचा ज्युस नियमित प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होते. तसंच ब्लॅाटिंग, गॅस, बद्धकोष्ठता आणि सूज यासारख्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता मूळापासून दूर करण्यासाठी दररोज सकाळी एक वाटी डाळिंबाचं सेवन करावं.
  • खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो: यात पॉलिफेनॉल संयुगे मोठ्या प्रमाणात आहेत. हे एक असे घटक आहे ज्यामुळे शरीरातील धमन्यांची जाडी वाढण्यापासून रोखली जातात. तसंच यात अँथोक्सॅन्थिन पुरेशा प्रमाणात आढळते. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम आहे.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7074153/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. मधुमेह ग्रस्तांनी चुकूनही खाऊ नये 'ही' फळं
  2. ववर्कआउटनंतर करा 'या' पदार्थांचं सेवन; दिवसभर रहा ताजेतवाणे
  3. केवळ पचनाच्या समस्यांपासून सुटका नाही तर लैंगिकता सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहे वेलची
  4. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याशिवाय मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ड्रॅगन फ्रुट
  5. हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी बीट फायदेशीर; जाणून घ्या बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Last Updated : Nov 30, 2024, 9:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details