हैदराबाद Causes For Belly Fat :लठ्ठपणाच्या समस्येनं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्रस्त आहेत. बहुतांश लोकांना अति खाल्ल्यामुळं लठ्ठपणा वाढतो, असा गैरसमज आहे. त्यामुळे वाटेल त्या पद्धतीचे डायट प्लान आपण फॅालो करतो. अनेकदा चुकीच्या जीवन पद्धतीचा अवलंब करतो. परिणामी शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. मात्र, शरीरातील लठ्ठपणा वाढण्यामागे अनेक दुसरी कारणंही कारणीभूत असू शकतात. ती कोणती हे आपण जाणून घेऊयात.
पोटावरील चरबी वाढल्यामुळे थकवा येणं, वारंवार भूक लागणं, काम करण्याची इच्छा नसणं तसंच मेंदूचं कार्य हळूहळू मंदावण्यास सुरुवात होते. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी पोटाची चरबी कमी करणं हे प्रमुख आव्हान असतं.
- या कारणांमुळे वाढते पाटाची चरबी
- व्यायामाचा अभाव : सतत कामात असल्यामुळे बहुतांश लोक व्यायाम करण्यास कचरतात. परिणामी वजन वाढतं. तज्ज्ञांच्या मते, रोज सकाळी एक तास व्यायाम केल्यास तुमच्या पोटाभोवतीची चरबी तर कमी होईलच उलट म्हातारपणातही शरीर मजबूत राहील. पोट कमी करण्यासाठी तुम्ही धनुरासन करू शकता. चरबी कमी करण्यासाठी धुनरासन खूप प्रभावी मानलं जातं. त्रिकोनासन केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसंच कमरेची चरबी कमी करण्यास हे आसन प्रभावी आहे.
- चुकीचा आहार :तज्ज्ञांच्या मते, आरोग्याला अपायकारक पदार्थ खाल्ल्यानं पोटाभोवती चरबी वाढते. बरेच लोक नियमितपणे गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचे अन्न सेवन असतात. यामुळे पोटावर अतिरिक्त चरबी जमा होते.
- अति प्रमाणात मद्यपान :अल्कोहोलमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असते. मद्यपानाच्या अति सेवनामुळे शरीरात चरबीही वाढते. याशिवाय वाईन घेताना अनेकजण साइड डिश म्हणून मांसाहार घेतात. त्यामुळे दोन्ही मिळून पोटात चरबी तयार होते. मद्यपान करणं हे यकृताच्या आरोग्यासाठीदेखील वाईट आहे.
- धूम्रपान : नॅशनल लायब्ररी ऑफ सायन्सच्या अहवालनुसार पोटावरील चरबीचे प्रमुख कारण धूम्रपान आहे. धूम्रपान केल्यानं शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल कमी होतो. वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यामुळे पोटाभोवतीची चरबी थेट वाढते. 2011 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांच्या पोटाभोवती चरबी जमा होण्याची शक्यता जास्त असते.
- अपुरी झोप :अनियमित आणि अपुरी झोप पोटाची चरबी वाढण्याचं एक कारण आहे. यामुळे दररोज 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे.
- तणाव :पोटाभोवती चरबी वाढवणारा एक घटक म्हणजे तणाव आहे. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन तयार होतं. यामुळे चयापचय सुरळीत होत नाही. त्यामुळे चरबी वाढते.
अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा