Bitter Gourd Juice Benefits:कारल्याचे सेवन केल्याने आपले आरोग्य सुधारते हे अनेकांना माहिती आहे. पण, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कारल्याचा रस केसांचे सौंदर्य वाढवतो. हे देखील समोर आले आहे की, कारल्याचा रस नियमितपणे टाळू आणि केसांना लावल्याने केस गळण्याची समस्या कमी होते. जाणून घेऊया कारले केसांच्या विविध समस्या टाळण्यास कशी मदत करू शकतात.
- केसगळती कमी करण्यासाठी अशाप्रकारे लावा कारल्याचा रस
अर्धा कप कारल्याचा रस घ्या आणि त्यात एक चमचा खोबरेल तेल मिसळा. नंतर, हे मिश्रण तुमच्या टाळू आणि केसांना लावा आणि दहा मिनिटे मालिश करा. अर्ध्या तासानंतर, कोमट पाण्याने आंघोळ करा. आठवड्यातून दोनदा हे मिश्रण लावल्याने केस गळती नियंत्रित होण्यास मदत होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. २०१९ मध्ये जर्नल ऑफ कॉस्मेटिक्स, डर्मेटोलॉजिकल सायन्सेस अँड अॅप्लिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या "केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी बायोएक्टिव्ह कंपाऊंड लोडेड नॅनोकॅरियर्स: सध्याची स्थिती आणि भविष्यातील दृष्टीकोन या अभ्यासात असं आढळून आलं आहे.
आपण वापरत असलेल्या केसांच्या उत्पादनांमधील रसायनांमुळे आणि बाह्य प्रदूषणाच्या परिणामांमुळे केसांना फाटे फुटतात. हे टाळण्यासाठी कारल्याचा रस केसांच्या फाट्यांवर लावा आणि तसाच राहू द्या. सुमारे ४० मिनिटांनंतर, कोमट पाण्याने आंघोळ करा. असं म्हणतात की जर तुम्ही आठवड्यातून दोनदा हे केले तर तुम्हाला तीन आठवड्यात चांगले परिणाम दिसतील.
- कोंडा गायब:कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी थोडसं जिरे घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट कारल्याच्या रसात मिसळा आणि टाळूला लावा. 15 ते 20 मिनिटं असच ठेवा आणि नंतर कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने कोंड्याची समस्या दूर होईल असे म्हटले जाते.
- पांढऱ्या केसांच्या समस्येसाठी:कारल्याचा रस केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि एक तास तसच ठेवा. त्यानंतर, थंड पाण्यानं केस धुवून घ्या. असं म्हटलं जातं की, काही दिवस नियमितपणे असं केल्यास चांगले परिणाम दिसून येतील.
- कोरड्या केसांसाठी:आपल्यापैकी अनेकांचे केस कोरडे दिसतात. अशा लोकांनी अर्धा कप कारल्याचा रस आणि दही घ्यावे. यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. या मिश्रणाचा काही भाग तुमच्या केसांना लावा आणि हलक्या हाताने थोडा वेळ मसाज करा. उरलेला भाग केसांना लावा आणि अर्धा तास वाढत ठेवा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. असं म्हटलं जातं की, हे वारंवार केल्याने तुमचे केस मॉइश्चरायझ होतील.