मुंबई- International Day for Biological Diversity :आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. निसर्गातील विविध प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण करणे हे खूप महत्वाचं आहे. जैवविविधता पर्यावरण संतुलित ठेवते. आपल्याला शुद्ध हवा, पाणी, अन्न आणि औषधे या महत्वाच्या गोष्टी देतात. हा दिवस आपल्याला निसर्गाच्या रक्षणासाठी काम करण्याची शिकवण देतो. 22 मे 1992 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या परिषदेच्या नैरोबी अंतिम कायद्याद्वारे आयडीबीचा अवलंब करण्यात आला होता. या वर्षासाठी आयडीबी 2024 ची संकल्पना आहे 'बी पार्ट ऑफ द प्लान.' या संकल्पने अंतर्गत, आपण हे समजून घेतले पाहिजे की आपले छोटेसे प्रयत्नदेखील पर्यावरणाच्या संरक्षणात मोठे योगदान देऊ शकतात.
निसर्गाचं रक्षण करा :यंदाच्या संकल्पनेचा अर्थ असा आहे की सरकार, संस्था, आणि लोकांनी जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे. निसर्गाच्या रक्षणासाठी सर्वांनीचं हातभार लावला पाहिजे. हा दिवस 1993 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. याच दिवशी जैवविविधतेचे महत्त्व लोकांना समजवून सांगण्यात आलं होतं. यावेळी संयुक्त राष्ट्रांनी निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी ठोस पावले उचलली होती. आपण सर्वांनी जैविक संपत्तीचा आदर आणि संरक्षण करायला पाहिजे. 2050 पर्यंत निसर्गाची हानी थांबवण्यासाठी ठोस उपाय आताच सेट केले गेले पाहिजे. पृथ्वीवर जगणारा प्रत्येक प्राणी जैविक संसाधनांवर अवलंबून आहे.