महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

ॲनिमियाच्या समस्येपासून सुटका हवी? आजच करा आहारात 'या' फळाचा समावेश - HEALTH BENEFITS OF APPLES

शरीरातील हिमोग्लोबनचे प्रमाण कमी झाल्यास ॲनिमियाचा धोका वाढतो. परंतु नियमित हे फळ खाल्ल्यास तुम्हाला ॲनिमियाची समस्या उद्भवणार नाही. वाचा सविस्तर..,

Health Benefits Of Apples
सफरचंद खाण्याचे फायदे (freepik)

By ETV Bharat Health Team

Published : Jan 22, 2025, 7:00 AM IST

Health Benefits Of Apples: 'एन एप्पल अ डे, कीप्स डॉक्टर अवे' ही म्हण आपल्यापैकी प्रत्येकानं ऐकली आहेच. सफरचंद आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. सफरचंदाच्या नियमित सेवनाने अनेक आजारापासून मुक्तता होवू शकते. सफरचंद खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हृदयरोगाचा धोका कमी होतो तसंच वजन कमी करण्यासाठी सफरचंद फायदेशीर आहे. एवढेच नाही तर, सफचंदामुळे शरीरातील लोहाची कमतरता देखील भरून निघते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते.

एनएचआयच्या अभ्यासानुसार, सफरचंद हे फायटोकेमिकल्सने समृद्ध स्त्रोत आहे. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन सी, प्रोटीन, अँटी-इंफ्लेमेटरी, फ्लेव्होनॉइड क्वेर्सेटिन, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम यासह अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जे विविध रोगांवर उपयुक्त आहे. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते, पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते, फायबर बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करते. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहते यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

ॲनिमियामध्ये फायदेशीर:तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 14-16 ग्रॅम प्रति डेसीलिटरच्या खाली येते, तेव्हा ॲनिमियाचा धोका वाढतो. परिणामी, व्यक्तीला ॲनिमियाचा त्रास होऊ लागतो. अशावेळी भूक न लागणे, अशक्तपणा येणे, हृदय गती कमी होणे अशा समस्या उद्भवतात. या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही नियमित एक सफरचंद खाल्ल पाहिजे. सफरचंद खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. सकाळी सफरचंद खाणे जास्त फायदेशीर आहे. संध्याकाळच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर सफरचंद खाणे योग्य नाही, असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे

ABOUT THE AUTHOR

...view details