Wheat Flour For Remove Tan: गव्हामध्ये अँटिऑक्सिडंट व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. जे त्वचा निरोगी आणि टवटवीत ठेवण्यासाठी उत्तम असल्याचं म्हटलं जात आहे. त्वचेच्या मृत पेशी सुद्धा काढून टाकण्यासाठीही गव्हाच पीठ चांगाल पर्याय आहे. त्वचेचे आरोग्य राखणे खूप गरजेचे आहे. बहुतेक लोक त्वचेच्या विविध समस्यांनी ग्रस्त असतात. सन टॅनिंग हा त्यापैकीच एक. घराबाहेर पडलो की जास्त सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा रंग खराब होतो. त्वचेवर काळे डाग पडतात. किंवा सुरकुत्या येऊ शकतात. परंतु, गव्हाचं पिठ प्रभावी आणि पूर्णपणे नैसर्गिक मार्ग असून याचा वापर करून सन टॅनच्या समस्येपासून मुक्त होवू शकतो.
किचनमध्ये सहज उपलब्ध असणारं गव्हाचं पिठ सन टॅन घालवण्यासाठी गुणकारी आहे. गव्हामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात असलेलं अँटिऑक्सिडेंट त्वचेला संरक्षण आणि टवटवीत करण्यासाठी फायदेशीर आहे. त्वचेवरील तेल काढण्यासाठी देखील गव्हाचे पीठ सर्वोत्तम आहे.
गव्हात झिंक असते. तसंच गव्हाच्या पिठामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. गव्हामध्ये लोह देखील भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे त्वचा उजळते आणि तिचा नैसर्गिक रंग टिकून राहतो. शिवाय, गव्हाचा वापर त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास आणि नवीन जीवन देण्यास मदत करतो.
सन टॅनपासून सुटका मिळवण्यासाठी गव्हाचं पीठ कसं वापरावं?
गव्हाचं पीठ आणि पाणी :एका भांड्यात एक चमचा गव्हाचं पीठ घ्या, त्यात पुरेसं पाणी घाला आणि पेस्ट तयार करण्यासाठी चांगलं मिसळा. हे मिश्रण त्वचेवर लावा. कोरडे झाल्यानंतर, थंड पाण्यानं धुवा.