महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

चेहऱ्यावरील चरबीमुळे त्रस्त आहात; फॉलो करा 'या' टिप्स, मग बघा कमाल! - Tips For Reduce Facial Fat

Tips For Reduce Facial Fat : वाढलेल्या वजनामुळे शरीराचं आकारमान (फिगर) चांगल दिसत नाही. वाढत्या वजनामुळे चेहऱ्यावरील चरबी देखील वाढू लागते. परिणामी चेहरा बेढब दिसतो. यामुळे आपण चारचौघात जाणं टाळतो. फिट राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. त्याच प्रमाणे चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठीही काही टिप्स अवलंब केल्यास चेहऱ्यावरील चरबी कमी होऊ शकते. वाचा सविस्तर...

Tips For Reduce Facial Fat
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्याच्या टिप्स (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Sep 4, 2024, 1:38 PM IST

Updated : Sep 4, 2024, 1:51 PM IST

हैदराबाद Tips For Reduce Facial Fat : लठ्ठपणाची समस्या ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नव्या लाईफस्टाइलमुळे त्यात अजून भर पडत चालली आहे. पोट, हात आणि मांडीची चरबी (फॅट) कमी करण्यासाठी जिममध्ये साधनं तरी उपलब्ध आहेत. मात्र, शरीरातील चेहऱ्याचा भाग असा आहे की, येथील चरबी कमी करण्यासाठी अशी साधनं उपलब्ध नाहीत. चेहऱ्यावरील फॅटमुळे माणूस बेढब तर दिसतोच शिवाय वयस्कर दिसू लागतो.

चेहऱ्यावर चरबी वाढण्याची विविध कारणं असू शकतात. त्यामध्ये वाढतं वय, चुकीची आहार पद्धती, सोडियमयुक्त पदार्थ, अतिप्रमाणात मद्य सेवन इत्यादी प्रमुख कारणं आहेत. डबल चिनची समस्या बहुतांश स्त्रियांमध्ये दिसून येते. पण या समस्येचं सोल्युशन काही सापडत नाही. याच समस्येपासून कशी सुटका करावी ते आपण पाहुयात.

फेशिअल एक्सरसाइज :चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी चेहऱ्यासंबंधित व्यायाम करणं गरजेचं आहे. चेहऱ्यासाठी काही ठराविक व्यायाम आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकर फायदा होईल. हे ट्राय करा - गाल फूगवा आणि ते 10 सेकंद धरून ठेवा. दहा वेळा ही क्रिया करा. यामुळे चेहऱ्याचे स्न्यायू मजबूत होतात. परिणामी चेहऱ्यावरील चरबी कमी होऊ लागते.

वजन कमी करा :जास्त वजनामुळे चेहऱ्यासह शरीराच्या सर्व भागांमध्ये चरबी जमा होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी दररोज चालणं, धावणं आणि सायकलिंग आदी व्यायाम करावेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2014 सोल नॅशनल युनिव्हर्सिटी बुंडंग हॉस्पिटल, कोरियाचे डॉ. यून जे.एच. (जी ह्यून यून) यांनी केलेल्या संशोधनात आणि 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी' मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अभ्यासात असं आढळून आलं की, एरोबिक व्यायाम (धावणे, सायकलिंग किंवा पोहणे) चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

चेहऱ्याचा मसाज:मसाज केल्यानं चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे त्वचेला रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्वचा निरोगी राहते. फेशियल योगा हा चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहे. यामुळे चिंता आणि तणाव कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, फेशियल योगामुळे त्वचा उजळ होते. नियमितपणे चेहऱ्याची मसाज करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

  • भरपूर पाणी प्या :भरपूर पाणी प्यायल्यानं त्वचा निरोगी राहते. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे चेहरा सुंदर दिसतो.

मीठ कमी करा:काही लोक त्यांच्या आहारात जास्त मीठ वापरतात. बऱ्याच जणांना वरून मीठ खाण्याची सवय असते. लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी त्यांच्या आहारात मिठाचा वापर कमी करावा. तसंच जंक फूड आणि फास्ट फूडपासून दूर राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय.

चांगली झोप :आजकाल स्मार्ट फोनच्या वाढत्या वापरामुळे अनेकांना रात्री चांगली झोप लागत नाही. ते मध्यरात्रीपर्यंत फोनकडं बघतात. त्यामुळे रात्री नीट झोप न लागल्यानं चेहऱ्यावरील चरबी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी तुम्ही किमान 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. या टिप्स फॉलो केल्यास काही दिवसातच चेहऱ्याची चरबी कमी करून तुम्ही सुंदर दिसू शकाल.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

फक्त अन्नच नाही, पोटाची चरबी वाढण्यामागं 'ही’ आहेत मुख्य कारणं - Causes For Belly Fat

चाळीशीत वजन घटवायचंय? आजच फॉलो करा 'या' टिप्स; वजन होईल झपाट्यानं कमी - weight Loss After 40 Age

Last Updated : Sep 4, 2024, 1:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details