महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

पुरुषांसाठी शक्तिवर्धक आहे 'हे' फळ; लैंगिक क्षमता वाढवण्यास उत्तम

खजूर हे एक पौष्टिक आणि ऊर्जा देणारं फळ आहे. चला तर जाणून घेऊ या तणांनी सांगितलेले खजुराचे आश्चर्यकारक फायदे आणि ते खाण्याची योग्य पद्धत..

By ETV Bharat Health Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

Benefits Of Dates
खजूर (Getty Images)

Benefits Of Dates: गोड आणि पौष्टिक फळांच्या यादीत सर्वात आवडीनं खाल्लं जाणारं फळ म्हणजे खजूर. शरीराला शक्ती प्रदान करण्यापासून ते निरोगी राहण्यासाठी प्राचीन काळापासून याचं सेवन केलं जातं. ऊर्जेचा उत्तम स्त्रोत असलेलं हे फळ विविध जीवनसत्वं, खनिजं आणि फायबरनं समृद्ध आहे. म्हणूनच या फळाला 'वंडर फूड' म्हणून ओळखलं जातं. खजुरातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं. तसंच यात आढळणारे अँटिऑक्सिडंट्स हृदयरोग टाळण्यासाठी फायदेशीर आहेत.

  • डॉक्टर काय म्हणतात?

नवी दिल्ली येथील अन्न आणि पोषण तज्ञ डॉ. दिव्या शर्मा यांनी सांगितल्यानुसार, नियमितपणे खजूर खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात. या फळामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहेत. हे हाडं मजबूत करण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे खजुरामधील नैसर्गिक साखर शरीराला त्वरीत ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे खेळाडू आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी खजूर खाणं फार फायदेशीर आहे. त्यातील अमिनो ॲसिड आणि प्रथिने स्नायूंना मऊ करण्यास मदत करतात.

याशिवाय खजुरमधील अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. "या फायद्यांव्यतिरिक्त खजूर खाल्ल्यानं पुरुष आणि महिलांना वेगवेगळे आरोग्य फायदे मिळतात." असं डॉक्टर दिव्या शर्मा यांनी सांगितलं. चला जाणून घेऊ या याचे अधिक फायदे.

  • महिलांसाठी खजूर खाण्याचे फायदे
  • खजुरामध्ये भरपूर लोह असतात. जे ॲनिमियावर उपचार करण्यास मदत करतं.
  • गरोदरपणात खजूर खाल्ल्यानं शरीराला शक्ती मिळते.
  • खजूर शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्याचे काम देखील करते. हे फळ मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर करते.
  • खजूर त्वचेसाठीही फार उपयुक्त आहे. यामुळे त्वचेची चमक वाढते आणि ती निरोगी राहते.

पुरुषांसाठी फायदे

  • खजूर पुरुषांची लैंगिक क्षमता वाढण्यास सहाय्यभूत ठरतं. लैंगिक आरोग्य सुधारल्यामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. तसेच याचा परिणाम पुरुषांची प्रजनन क्षमता वाढण्यात होतो.
  • खजूर खाल्ल्यानं तणाव कमी होतो आणि शरीरातील ऊर्जा पातळी वाढते.
  • खजूर खाण्याची योग्य पद्धत

डॉ. दिव्या सांगतात की, खजुराचे सेवन अनेक प्रकारे केले जाऊ शकते. परंतु दूधासोबत घेतल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीराला शक्ती आणि ऊर्जा प्रदान करतं. विशेषत: जेव्हा तुम्हाला अशक्तपणा जाणवतो त्यावेळी दूध आणि खजूराचे मिश्रण स्नायूंना मजबूत करण्यास, हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत होते. हे मिश्रण विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांसाठी उपयुक्त आहे. कारण ते त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवते. सकाळी 2-3 खजूर खाणं देखील खूप फायदेशीर आहे. कारण यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते आणि पोट साफ राहते. नट्समध्ये खजूर मिसळून स्नॅक म्हणून देखील खाल्ले जाऊ शकतात.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. 'या' वनस्पतीची पानं औषधापेक्षा सरस, मधुमेहासह वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
  2. 'हे' ड्रायफ्रुट्स करणार हृदयविकारापासून तुमचा बचाव
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details