How Are Diabetes And Stress Link:बैठी जीवनशैली, अपूर्ण झोप, कामाची धावपड तसंच अयोग्य आहारापद्धतीमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होतात. कामाचं ताण तसंच टार्गेट पूर्ण करण्याची लगबग यामुळे अनेक जण तणावामध्ये जगत आहेत. ताण घेतल्यामुळे गंभीर आजारांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. मानसिक ताण आजकाल लोकांच्या चिंतेचा विषय होत चालला आहे. तसंच मधुमेहाचं देखील आहे. मधुमेह देखील चिंतेचा विषय आहे. मधुमेह आणि तणाव यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण तणावादम्यान शरीरातील कोर्टिसोल संप्रेरकाची पातळी झपाट्यानं कमी होते. परिणामी इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढते आणि शरीरातील साखर अनिंत्रित होते असं म्हटलं जाते. चल तर जाणून घेऊया मानसिक आरोग्य आणि मधुमेह यातील संबंध
- तणावाचा मधुमेहावर कसा परिणाम होऊ शकतो?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताण येतो. तेव्हा त्याचे शरीर कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालाईन सारखे संप्रेरक बाहेर सोडतो. परिणामी इन्सुलिनला योग्यरित्या काम करणे कठीण होते. ज्याला इन्सुलिन प्रतिरोधक देखील म्हणतात. यामुळे ऊर्जा तुमच्या पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते. जर रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात वाढली तर त्याला गोइंग हायपर म्हणजेच हायपरग्लायसेमिया म्हणतात. तणाव कमी झाला नाही तर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
- तणावामुळे मधुमेह होऊ शकतो का?
डीयबीटीक युकेच्या एका अभ्यासानुसार, केवळ तणावामुळे मधुमेह होत नाही. परंतु असे काही पुरावे आहेत की ताण आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका यांच्यात संबंध असू शकते. संशोधानातुन असं स्पष्ट झालं आहे की, तणाव संप्रेरकांचे उच्च प्रमाण स्वादुपिंडातील इन्सुलिन उत्पादक पेशींना योग्यरित्या कार्य करण्यापासून थांबवू शकते. परिणामी इन्सुलिनचे प्रमाण कमी करून शकते. जे मधुमेह टाइप 2 च्या विकासास कारणीभूत ठरू शकते. तणाावामध्ये ज्या लोकांमध्ये जास्त कॉर्टिसोल उत्पन्न होतो, त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका जास्त आहे असं संशोधात आढळून आलं. ताणतणावत असताना जास्त खाल्ल्यामुळे देखील लोकांना टाइप 2 मधुमेहाचा धोका होवू शकतो.
- ताणतणावाचे व्यवस्थापण करण्यासाठी हे करा
- नियमित ध्यान करा:नियमित सकाळ संध्याकाळ 20 ते 30 मिनिटं ध्यास साधना केल्यास तणावाचं व्यवस्थापण करता येवू शकते. कारण ध्यान केल्यास मनाला शांती मिळते. तणाव कमी होतो तसंच सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होते. प्रथम 5 मिनिटांपासून ध्यास करण्यास सुरुवात करा हळूहळू हे वाढवून 30 मिनिटं ध्यान करण्याची सवय लावा.
- व्यायाम: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे फायदेशीर आहे. व्यायाम केल्यास तुम्ही तंदुरुस्त राहता शिवाय चांगली झोप देखील येते. यामुळे हाडे मजबूत होतात. व्यायाम केल्यास वजन वाढीची समस्या देखील दूर करता येवू शकते.
- वाचन करा: नियमित वाचन करणं चांगलं आहे. आवडत असलेल्या एखाद्या साहित्यापासून तुम्ही वाचनास सुरुवात करू शकता. यामुळे तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होते. मन प्रसन्न होतो शिवाय मनात सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होते.
- पुरेशी झोप: तणावाचं व्यवस्थापण करताना झोप महत्वाची भूमिका बजावते. चांगल्या आरोग्यासाठी नियमित किमान 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. पूर्ण झोप घेतल्यामुळे दिवसभर ताजतवाण वाटते. तसंच तणाव आणि चिंता कमी होते.
- योग्य आहार: आहारात योग्य पोषक घटकांचा समावेश असणे गरजेचं आहे. कारण हे आपल्याला उर्जा प्रदान करतात यामुळे मन प्रसन्न राहते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)