महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

उपाशी पोटी लसूण खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; तणावासह रक्तदाब नियंत्रित - HEALTH BENEFITS OF GARLIC

रोज उपाशी पोटी लसूण खाण्याचे असंख्य फायदे आहेत. चला तर जाणून घेऊ उपाशी पोटी लसूण खाण्याचे उद्भुत फायदे.

Health Benefits Of Garlic
लसूण खाण्याचे फायदे (Getty Images)

By ETV Bharat Health Team

Published : Nov 18, 2024, 12:05 PM IST

Health Benefits Of Garlic: जेवण रुचकर होण्यासाठी भाज्यांमध्ये लसणाचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे काय? जेवणाची चव वाढवण्याबरोबरच लसूण तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लसणामध्ये अ‍ॅंटीबॅक्टेरियल, फॉस्फरस, कार्बोहाड्रेट, अ‍ॅंटीफंगल, थायमिन, राइबोफ्लेविन, झिंक, तांबे, पोटॉशियम आदी पोषट घटक आढळतात. यामुळे रोज सकाळी उपाशी पोटी लसूणाचं सेवन केल्यास नैसर्गिकरित्या तुम्ही बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकता.

  • रक्तदाब:दीर्घकालीन रक्तदाबानं त्रस्त असलेल्यांनी सकाळी उपाशी पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास शरीराच्या नसा गुळगुळीत होतात. शिवाय मज्जातंतूचे आकुंचन आणि विस्तार नियंत्रित होतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहिल.
  • तणाव नियंत्रणात: लसणाच्या नियमित सेवनानं मानसिक आरोग्य चांगलं राहते. लसणाच्या सेवनानं मन संतुलित राहेत. यामुळे डिप्रेशनशी लढण्याची ताकद वाढते. तसंच तणाव टाळण्यासाठी लसूण फायदेशीर आहे.
  • पोटाची समस्या दूर:सकाळी रिकाम्या पोटी कच्चे लसूण खाल्ल्यास यकृताला सुरळीत कार्य करण्यास मदत होते. यात आढळणाऱ्या अ‍ॅंटी मायक्रोबियल गुणधर्मामुळे गॅस, पोटदुखी, अ‍ॅसिडिटी सारख्या पोटासंबंधित समस्या दूर होतात.
  • हृदयरोग: कच्चे लसूण दररोज रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्यातील सक्रिय घटकांमुळे हृदय निरोगी राहते. तसंच रक्त गोठण्यापासून प्रतिबंधित करते यामुळे हृदविकाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
  • शरीर स्वच्छ करते:पोटात जंत झाल्यास ते बाहेर काढण्यासाठी दररोज लसूण खाणं चांगलं आहे. यामुळे पोटातील जंत आणि घाण लघवीद्वारे बाहेर पडतात.
  • श्वसनासंबंधित विकार दूर:क्षयरोग, न्यूमोनिया, छातीत जळजळ, सर्दी, दमा आदी विकारांनी त्रस्त असलेल्यांनी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास चांगले परिणाम मिळतात.
  • खबरदारी: कच्चे लसूण खाल्ल्यास अनेकांना ऍलर्जी होऊ शकते. ते टाळण्यासाठी तुम्ही उकडलेलं लसूण खाऊ शकता. अन्यथा, लसूण खाणं टाळावं.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. 'या' लहान सवयीमुळे तुमचं आयुष्य 11 वर्षांनी वाढेल!
  2. आरोग्यवर्धक आहे पाया सूप; सांधेदुखी आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम
  3. हिवाळ्यात अशाप्रकारे रहा निरोगी
  4. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहेत 'हे' पदार्थ; सकाळी उपाशी पोटी घेतल्यास रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

ABOUT THE AUTHOR

...view details