महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

केस गळतीच्या समस्येनं त्रस्त आहात? आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश; केस गळती त्वरीत थांबेल - Hair Loss Causes - HAIR LOSS CAUSES

Hair Loss Causes : केस गळतीनं अनेक लोकं त्रासली आहेत. ते थांबवण्यासाठी बाजारात विविध महागडे तेल, शॅम्पू आणि अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. परंतु, अनेकांना त्याचा उपयोग करूनही फायदा होत नाही. त्यामुळे नाहक पैसे देखील खर्च होतात. केस गळतीच्या समस्येनं तुम्ही देखील त्रस्त असाल तर जाणून घ्या काही महत्वाच्या टिप्स.

Hair Loss Causes
केस गळती थांबवण्याचे उपाय (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Aug 31, 2024, 5:34 PM IST

हैदराबाद Hair Loss Causes : केस गळण्याच्या समस्येनं महिलाच नव्हे तर पुरुष देखील त्रस्त आहेत. झोप न लागणे, तणाव, प्रदूषण आदी कारणं या समस्येला कारणीभूत ठरू शकतात. तणावामुळे शरीरातील कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी वाढते. केर्टोसोल केस गळतीशी संबंधित हार्मोन आहे. तज्ज्ञांच्या मते शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता हे देखील केसांच्या समस्यांचे मुख्य कारण असू शकते. त्यामुळे दैनंदिन आहारात ‘डी’ जीवनसत्त्वाचं प्रमाण पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे. चला तर मग व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले घटक पाहूया.

आपण जे पदार्थ सेवन करतो त्यावर आपलं आरोग्य तसंच रोगप्रतिकार शक्ती अवलंबून आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास व्हिटॅमिन डीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला केस गळती थांबवायची असेल तर व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ सेवन करणं गरजेचं आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालात असं आढळून आलं की, शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी कमी झाल्यास केस गळण्यासोबतच अलोपेसिया सारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी तसंच केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

व्हिटॅमिन डी समृध्द अन्न

मासे: व्हिटॅमिन डी विशेषतः सॅल्मन, ट्यूना, मॅकेरल आणि सार्डिनसारख्या माशांमध्ये भरपूर असते. यासोबतच त्यामध्ये असलेले इतर पोषक घटक जसे की, कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस इत्यादी सर्वांगीण आरोग्यास फायदेशीर आहेत.

मशरूम : मशरूममध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाणही जास्त असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याशिवाय मशरूममध्ये B1, B2, B5, तांबे यांसारखे पोषक घटकही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मशरूमचा नियमित आहारात समावेश केल्यास चांगला परिणाम होईल.

दूध आणि दही : तज्ज्ञांच्या मते, दूध आणि दही शरीराला व्हिटॅमिन डी पुरवण्यासाठी खूप मदत करतात. यामध्ये असलेले प्रोटीन आणि कॅल्शियम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

अंड्यातील पिवळं बलक :अंड्यातील पिवळ बलक, तृणधान्ये, चीज, सोया दूध, ओट्समध्ये देखील व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं. दैनंदिन आहारात यांचा समावेश केल्यास शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळेल.

सूर्यप्रकाश :सकाळी किमान पंधरा मिनिटे उन्हात उभं राहिल्यास पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. रोजच्या आहारात ‘डी’ जीवनसत्त्वाचा समावेश केल्यास केसांच्या समस्या टाळता येऊ शकतात.

अधिक माहितकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/34553483/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

मधुमेही रूग्ण खजूर खावू शकतात काय? जाणून द्या तज्ज्ञ काय सांगतात - Can Diabetic Patient Eat Dates

आहारात 'या' फळ आणि भाज्यांचा समावेश करा; मिठाच्या दुष्परिणामांपासून होईल सुटका - Reduce side effects of salt

ABOUT THE AUTHOR

...view details