हैदराबाद Tips To Stop Gas Pain : चुकीच्या आहारामुळे पोटाशी संबंधित विविध आजारनं अनेक लोक त्रस्त आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे अन्न ग्रहण करण्याची अयोग्य पद्धत. चुकीच्या आहारामुळे पोटाशी संबंधित विकार जळतात. यातील एक समान्य समस्या म्हणजे पोटामध्ये गॅस तयार होणे. यालाच ब्लॅाटिंग असं देखील म्हणतात. असंतुलित आहारामुळे लोकांना पचनाच्या समस्या उद्धवतात. तसंच जास्त खाल्ल्यानं गॅस, आंबट ढेकर आणि पोट फुगणे आदी समस्या भेडसावतात. अनेक उपाय करून देखील पोट फुगण्याची समस्या बरी होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नैसर्गीकरित्या हा त्रास कसा कमी करायचा? याबद्दल माहिती देत आहोत. प्रसिद्ध सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. लक्ष्मीकांत यांनी यावर काही उपाय सुचविले आहेत.
अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत पोटामध्ये भरपूर वायू तयार होतो. हे वायू बाहेर न पडल्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटते. तसंच अन्न खाताना काही हवाही आत जाते. कधी-कधी पोटात खूप गॅस झाल्यास पोटात दुखणं, फुगणं, पोट भरल्यासारखं वाटणं आणि आतड्यांमध्ये गाठ पडणं अशा समस्या उद्भवतात.
''पोट फुगल्यासारखं वाटण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य म्हणजे वेळेवर जेवण न करणे, कार्बोनेटेडयुक्त पेयं पिणे यामुळे ही समस्या उद्भवते. काही प्रकारच्या अन्नामुळेही पोट फुगलं जातं. तसंच काही लोकांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेतल्यानं बद्धकोष्ठतेमुळे पोटात गॅस होतो. - डॉ. टी. लक्ष्मीकांत''
- पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी टिप्स
- जेवताना अन्न हळूहळू चघळा
- खाण्याच्या सवयी बदला. संतुलित आहार घ्या.
- पुदिन्याचा चहा प्यायल्यानं गॅसची समस्या दूर होवू शकते.
- जेवताना बोलू नका.
- जास्त पाणी प्या.
- फायबरयुक्त अन्न जास्त प्रमाणात घ्यावं. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.
- फिजी ड्रिंक्स आणि कार्बोनेटेड पेये कमी प्रमाणात प्यावं.
- पेंढ्यामधून पेये घेऊ नयेत.
- काही लोकांना ब्रोकोली आणि हिरव्या भाज्या नीट पचत नाहीत. अशा लोकांनी त्यांच्यापासून दूर राहावं.
- च्युइंगम्स आणि काही स्वीट पदार्थांमध्ये कृत्रिम साखर असते. यामुळे देखील पोटात गॅस होतो.
- रात्री नीट झोप न घेतल्यानंही पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे रात्रीची झोप पूर्ण झाली पाहिजे.
- तणाव आणि जास्त विचार केल्यानं पोट खराब होऊ शकतं. त्यामुळे शांत राहावं असं डॉ. लक्ष्मीकांत यांच म्हणणं आहे.