MAHA KUMBH 2025:महाकुंभ 2025 हा जगातील सर्वात मोठा कुंभमेळा आहे. ज्यामध्ये 40 कोटीहून अधिक लोक सहभागी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 13 जानेवारी रोजी शाही स्नानानिमित्त सुमारे दीड कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केलं. तसंच 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सुमारे 3.5 कोटी लोकांनी शाही स्नानामध्ये सहभाग घेतला. मौनी अमासवस्येला तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज कोट्यवधी लोक शाही स्नानामध्ये सहभागी होणार असल्याची संभावना व्यक्त करण्यात आली आहे. महाकुंभ 2025 मेळ्याचा आज 17 वा दिवस आहे, अजून 28 दिवस बाकी आहेत. परंतु आरोग्य तज्ज्ञांनी आणि संशोधकांनी या मेळाव्यामुळे भविष्यात अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात अशी चिंता वर्तवली आहे.
सध्या भारतामध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस किंवा एचएमपीव्हीची प्रकरणे समोर येत आहेत. हे श्वसनासंबंधित आजार आजार आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये याच्या प्रसार जलद होतो. सध्या श्वासोच्छवासाच्या समस्या निर्माण करणाऱ्या विषाणू आणि इन्फ्लूएंझाच्या जलद प्रसारामुळे जागतिक आरोग्यविषयक चिंता वाढल्या आहेत.
- जागतिक आरोग्य संघटना:जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अनेक देशांमध्ये हिवळ्यात गंभीर श्वसन सिंड्रोमच्या संसर्गामध्ये वाढ होत आहे. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात अशा सामूहिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. श्वसन सिंड्रोम आणि देशभरात पसरलेल्या विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहनही अनेक तज्ञांनी केले आहे.
- ट्रॅव्हल मेडिसिन अँड इन्फेक्शियस डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात असं म्हटलं आहे की, महाकुंभ मेळा 2025, हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. देश-विदेशातील लाखो लोक यात सहभागी होत आहेत, हा कार्यक्रम परंपरा आणि अध्यात्मात खोलवर रुजलेला असला तरी सार्वजनिक आरोग्यासमोर ते महत्त्वपूर्ण आव्हानेही निर्माण करू शकतात.
- मे 2024 रोजी 'जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिन' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक मेळाव्यात खालील आजार सहजपणे पसरू शकतात.
- श्वसन संक्रमण - इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया आणि इतर विषाणूजन्य रोग
- तापाशी संबंधित आजार – विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि चिकनगुनिया
- त्वचा संक्रमण - जवळच्या संपर्कामुळे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य त्वचेची स्थिती
- गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग - दूषित अन्न आणि पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि हिपॅटायटीस
- वेक्टर-जनित रोग - मलेरिया आणि डेंग्यू सारखे डासांपासून होणारे आजार
- जलजन्य संसर्ग - दूषित पाण्यात अंघोळ केल्यामुळे कॉलरा आणि टायफॉइड
याव्यतिरिक्त, कार्यक्रमादरम्यान खराब स्वच्छता, जास्त गर्दी आणि कचऱ्याची योग्य व्हिलेवाच न लावल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.
- कुंभमेळ्याच्या आरोग्यविषयक आव्हानांवर मागील संशोधन