Pineapple Side Effects: गोड आणि आंबट चव असणारं अननस आपल्यापैकी बहुतेकांना आवडतं. अननस हे एक चविष्ट आणि रसाळ फळ आहे. यात रिबोफ्लेविन, लोह, पोटॅशिम, फायबर, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं. पचनक्रिया खराब असणाऱ्या लोकांनी याच सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत होते. तज्ञांच्या मते, अननस खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु जर तुमच्या शरीरात खाली नमूद आरोग्य समस्या असतील तर तुम्ही ते खाऊ नये, अन्यथा समस्या आणखी वाढू शकतात.
- या आजारानी ग्रस्त असलेल्या लोकांनी अननस खाऊ नये
- सेलिआक रोग:सेलिआक रोग असलेल्या लोकांसाठी अननस हे चांगलं नाही, कारण ते ग्लूटेनशी प्रतिक्रिया करू शकते. अननसमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे एंझाइम ब्रोमेलेन असते. ज्यामुळे सेलिआक रोग आणखी वाढू शकतो. सेलिआक असलेल्या लोकांनी अननस खाल्लं तर सूज येणे, वेदना आणि इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकते.
- गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा अॅसिडिटी समस्या:जठराची सूज किंवा ऍसिडिटीची समस्या असलेल्या लोकांसाठी अननस खानं हानिकारक ठरू शकते. अशा लोकांनी ते खाल्ल्यास समस्या वाढू शकते.
- किडनी रोग:व्हिटॅमिन सी चे जास्तीत जास्त दैनिक सेवन सुमारे 200 मिग्रॅ आहे. अननस हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या किडनीचे नुकसान होण्यापासून वाचवायचे असेल तर अननसाचे सेवन मर्यादित करा.
- मधुमेही रुग्ण: अननसात नैसर्गिक शर्करा आणि कॅलरीज जास्त असतात. मधुमेहींनी ते घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते. परिणामी तुमची तब्येत अचानक बिघडू शकते. मधुमेहींनी अननसाऐवजी इतर फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा.
संदर्भ
https://www.sciencedirect.com/topics/pharmacology-toxicology-and-pharmaceutical-science/pineapple
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC8028712/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)