Deepika Padukone Glowing Skin: आपल्यापैकी प्रत्येकालाच सुंदर दिसावं असं वाटत असतं. अनेकांना तर बॅालिवूडच्या अभिनेत्रींसारखी त्वचा हवी असते. त्यातही दीपिका पदुकोण हिच्या सौंदर्यानं तरुणच नाही तर तरुणिंनाही भूरळ घातली आहे. तिची कचमकदार त्वचा दीपिका पदुकोणच्या सौंदर्यात चार चॉंद लावते. अनेक तरुणी दीपिका सारखं सौंदर्य मिळावं म्हणून विविध प्रोडक्टचा वापर देखील करतात. परंतु पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट त्यांना मिळत नाही. मात्र, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दीपिकाच्या सौंदर्याचे ‘राज’. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट आणि दीपिका पदुकोणची माजी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी दीपिकाच्या सौंदर्यामागील रहस्य उघड केलं आहे.
श्वेता शाह या दीपिकाच्या माजी पोषणतज्ञ आहेत. त्यांनी सांगितलं की, 2018 मध्ये दीपिकाच्या लग्नाआधी त्या तीला भेटल्या. त्यावेळी दीपिकाला चमकदार त्वचा हवी होती. याकरिता तिने खूप काळजी घेतली. चमकदार त्वचेसाठी आणि केसांसाठी श्वेतानं दीपिकाला एका ज्यूसची शिफारस केली होती. दीपिका सलग तीन महिने तो ज्युस प्यायली. यामुळे तिची त्वचा आणखी चमकदार दिसू लागली. ज्युस पिण्याचा परिणाम आज तुमच्या समोर आहे. ते कसं तयार करावं जाणून घेऊ.
- साहित्य
- बीटरूट
- पुदिन्याची पाने
- कोथिंबीर
- कढीपत्ता नाही
- कडुलिंबाचे पान
- कृती:बीटरूट, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कडुलिंबाची पाने मिक्सरमध्ये टाकून चांगले बारीक करा. नंतर गाळून प्या.
- हे लक्षात ठेवा: या ज्युसचे अनेक फायदे आहेत. हे शरीरातील डिटॉक्सिफाईंग आणि पचन सुधारण्यात खूप मदत करते. परंतु हे त्वचेला उजळण्यासाठी चांगले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. रोसेसिया, मुरुम, एक्जिमा आणि त्वचारोग यासारख्या त्वचेच्या समस्या असलेल्या लोकांनी हा रस पिऊ नये. तसंच आहारतज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अशा पेयांचे सेवन करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक आरोग्य आणि कार्यप्रदर्शन वेगळे असते. संवेदनशील त्वचा, ऍलर्जी-संबंधित आजार असलेले लोक आणि नियमित औषधोपचार घेणाऱ्यांनी या पद्धतींचा अवलंब करायचा असेल तर विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे.