महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

मधुमेह ग्रस्तांनी नाश्त्यात घ्या 'हे' पदार्थ - Breakfast For Diabetes Patient

Breakfast Food For Diabetes Patient : मधुमेह ग्रस्तांनी नाश्त्यात कोणते पदार्थ घ्यावेत. याबद्दल पोषणतज्ञ डॉ. सुचरिता सेनगुप्ता यांनी सांगितलं आहे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.

By ETV Bharat Health Team

Published : 4 hours ago

Updated : 2 hours ago

Breakfast For Diabetes Patient
मधुमेह रुग्णांसाठी पोषक नाश्ता (Getty Images)

Breakfast Food For Diabetes Patient : सकाळी नाश्ता करणे आरोग्यासाठी अत्यंत चांगल आहे. परंतु, अनेक लोक सकाळची न्याहरी वगळतात. यामुळं आरोग्याविषयक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मधुमेह रूग्णांनी सकाळचा नाश्ता वगळणं जास्त धोकादायक आहे. मधुमेह ग्रस्तांना सकाळच्या नाश्त्यात काय खावं तसंच काय खाणं फायदेशीर ठरू शकते? हे प्रश्न नियमित पडतात. याबद्दल न्यूट्रिशनिस्ट डॉ. सुचरिता सेनगुप्ता यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या पदार्थांचा मधुमेहाच्या रूग्णांनी आपल्या नाश्त्यात समावेश केल्यास त्यांना फायदा होवू शकतो.

  • या पदार्थांचा आहारात करा समावेश
  • ओट्स : ओट्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला नाश्ता आहे. ओट्समध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. तसंच ओट्स रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. पोषणतज्ञ डॉ. सुचरिता सेनगुप्ता यांच्या मते तुम्ही मसाला ओट्स नाश्त्यात घेवू शकता.
ओट्स (ETV Bharat)
  • अंडी: मधुमेह ग्रस्तांनी आपल्या आहारात अंड्यांचा समावेश करावा. अंडी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. तसंच अंडयांमध्ये इतर पोषक तत्व देखील मुबलक प्रमाणात आढळतात. त्यासाठी तुम्ही उकडलेले अंडे खाऊ शकता. ज्यामुळे तुमच्या रक्ताची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल. 2017 मध्ये 'जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी' मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असं सुचवण्यात आलं की, मधुमेह टाळण्यासाठी फक्त उकडलेली अंडी, मीठ, मिरपूड आणि धणे खाणं चांगलं आहे.
उकडलेला अंडा (ETV Bharat)
  • स्मूदी :स्मूदी हे पचायला सोपं पदार्थ आहेत. स्मूदीमध्ये देखील पौष्टिक घटक असतात. तुम्ही वेगवेगळे ड्राय फ्रूट्स आणि ताजी फळे मिसळून स्मूदी खाऊ शकता. मधुमेहासाठी कोणती फळे खाऊ शकतात याबद्दल मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्मूदी (ETV Bharat)
  • ज्वारीची भाकर : डॉक्टरांच्या मते, संपूर्ण धान्यांपासून तयार केलेली भाकर मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर आहे. भाकर मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगलं अन्न आहे. न्यूट्रिशनिस्ट रुचिता बत्रा सांगतात की ज्वारीच्या भाकरीमध्ये ५० ते ६० कॅलरीज असतात. तसंच ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळं रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही.
भाकरी (ETV Bharat)
  • ब्राऊन ब्रेड : जर तुम्हाला ब्रेड खायला आवडत असेल, तर तुम्ही पांढऱ्या मैदाच्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खाऊ शकता. त्यात जास्त फायबर आणि कमी कार्बोहायड्रेट असतात. न्याहारीसाठी, अंडी आणि एवोकॅडोसह सँडविच बनवून खावू शकता.
ब्राऊन ब्रेड (ETV Bharat)
  • दलिया किंवा खिचडी : मधुमेहाचा त्रास असलेले लोक नाश्त्यात दलिया किंवा खिचडी खाऊ शकतात. यामुळे पोट जास्त काळ भरलेलं राहतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ- NIH नं प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, मधुमेह रुग्णांच्या आहारात काही गोष्टी कटाक्षानं पाळाव्यात ठेवाव्यात आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK279012/#:~:text=Good%20sources%20of%20lean%20animal,and%20not%20the%20entire%20meal.

https://www.niddk.nih.gov/health-information/diabetes/overview/healthy-living-with-diabetes#:~:text=Nonstarchy%20vegetables%E2%80%94such%20as%20leafy,one%2Dquarter%20of%20your%20plate.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवायचं? हा डोसा फायदेशीर - Instant Jowar Dosa Recipe
  2. हृदयाचे आरोग्य सुरळीत ठेवायच आहे? आहारात करा ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा समावेश - Omega 3 Fatty Acids
Last Updated : 2 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details