NUTRITION IN MORINGA LEAVES:खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयीमुळे तसंच बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. लठ्ठपणा ही एक मोठी आरोग्य समस्या आहे. यामुळे विविध आजार जडण्याची दाट शक्यता असते. लठ्ठपनामागील मुख्य कारण म्हणजे व्यायाम आणि शारीरिक श्रमाच्या अभाव. एकदा लठ्ठपणाचे शिकार झाल्यास अनेक उपाय करून देखील लठ्ठपणा कमी होत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे काय? आपल्या किचन गार्डनमध्ये किंवा परिसरात सहज उपलब्ध असलेल्या मोरिंग्याची पानं(शेवग्याची पानं) लठ्ठपणा कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहेत.
- मोरिंगामध्ये असलेले पोषक घटक
- व्हिटॅमिन ए, सी, बी, ई
- कॅल्शियम
- पोटॅशियम
- मॅग्नेशियम
- लोह सामग्री
- प्रथिने
- फायबर
- पोटॅशियम
- पालक हे फॉस्फरससारख्या पोषक तत्वांचे भांडार आहे.
- मोरिंगाची पान खाण्याचे फायदे
- मोरिंग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, क्वेर्सेटिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड यांसारखे अँटिऑक्सिडंट असतात. जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. 2022 च्या अभ्यासात असं आढळून आलं की, मोरिंगाच्या पानांमुळे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण होते. तसंच हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या जुनाट आणि घातक रोगांचा धोका देखील कमी होतो.
- कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासाठी मोरिंगा पान प्रभावी आहेत. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि बायोएक्टिव्ह संयुगे देखील आढळतात. जे हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. फायटोथेरपी रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मोरिंगाच्या पानांच्या नियमित सेवनानं संधिवात आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
- अनेक अभ्यासातून असं दिसून आलं, की मोरिंगाची पानं रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. मोरिंगा मधील बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स केरॅटीन आणि क्लोरोजेनिक ॲसिड हे इंसुलिनची संवेदनशीलता सुधारत असल्याचे दिसून आलं आहे. तसंच, 2017 मध्ये एनसीबीआय ने केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, ड्रमस्टिक्समधील बायोएक्टिव्ह β-sitosterol कोलेस्ट्रॉल कमी करते.
- जर्नल ऑफ फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, त्यातील फायबर आणि बायोएक्टिव्ह संयुगे निरोगी पचनास प्रोत्साहन देतात. मोरिंगाची पानं बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी तसंच पोटातील चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देतात त्याचबरोबर आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी मोरिंगा पान फायदेशीर असल्याचे सिद्ध झालं आहे.
- मोरिंगा पानांचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळते. अभ्यासातून असं दिसून आलं, की मोरिंगा यकृताचे कार्य सुधारण्यास, यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि यकृताच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकते.
- मोरिंगाची पानं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. जे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहेत. मोरिंगाच्या हिरव्या पानांचे नियमित सेवन केल्यास ऑस्टियोपोरोसिस सारखी समस्या दूर होते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ