महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

जेवल्यानंतर टाळा ‘या’ गोष्टी? पडेल महागात - After Meals Habit - AFTER MEALS HABIT

After Meals Habit : जसं निरोगी राहण्यासाठी योग्य पोषक आहाराची गरज आहे. तसंच आहाराची योग्य चयापचय क्रिया होण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. डॉक्टारांनुसार जेवल्यानंतर काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. ज्यामुळे घेतलेल्या आहाराचा जास्तित जास्त फायदा होइल. चला जाणून घेऊया जेवणांतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे.

After Meals Habit
जेवल्यानंतर टाळा ‘या’ गोष्टी? (GETTY IMAGES)

By ETV Bharat Health Team

Published : Sep 9, 2024, 1:28 PM IST

हैदराबाद After Meals Habit: आरोग्यदायी जीवन जगण्याकरिता ज्याप्रकारं सकस आहाराची गरज आहे, तशीच गरज आहे जेवण झाल्यानंतर काही नियम पाडण्याची. दैनंदिन जीवनात आपण अशा काही चुका करतो, ज्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. बरेच लोक अशा चुका करतात त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येवू शकतं. या चुकीमुळे अ‍ॅसिडीटी, वजन वाढणं तसंच इतर गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे.

  • जेवणानंतर या गोष्टी करू नका
  • आंघोळ करू नका :काही लोकांना जेवल्यानंतर आंघोळ करण्याची सवय असते. अशा लोकांनी ही सवय टाळणेच चांगलं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी पोटाला योग्य प्रमाणात रक्ताभिसरण आणि ऊर्जा लागते. जेवणानंतर आंघोळ केल्यास रक्ताभिसरण त्वचेच्या दिशेनं होते. तसंच त्यामुळे शरीराच्या तापमानात फरक पडतो. परिणामी अन्न पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे अपचनासारख्या समस्या होण्याची शक्यता असते. तसंच पोटासंबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. जेवल्यानंतर 30 किंवा 40 मिनिटांनी आंघोळ करणं चांगलं आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
  • जास्त पाणी पिऊ नका : बरेच लोकं जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पितात. पण, असं केल्यानं पचनशक्तीवर परिणाम होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जेवल्यानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्यास अन्न पचायला मदत करणाऱ्या एन्झाईम्सच्या कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नाचं पचन नीट होत नाही तर शरीरात विषारी द्रव्येही प्रचंड प्रमाणात वाढू शकतात. म्हणूनच जेवल्यानंतर एका तासानं पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
  • चहा आणि कॉफी टाळा: तुम्हाला जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे का ? ही सवय टाळणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण खाल्ल्यानंतर कॉफी आणि चहा प्यायल्यास त्यातील टॅनिन आणि काही प्रकारचे अ‍ॅसिड, अन्नातून पोषकद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी करतात. त्यामुळे पचनक्रिया बिघडते. जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी न घेता तासाभरानंतर कमी प्रमाणात घेतल्यास काहीच हरकत नाही. 2000 साली 'जर्नल ऑफ न्यूट्रिशन'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, जे लोक जेवणासोबत कॉफी पितात त्यांना अन्न पचायला जास्त वेळ लागतो. हे संशोधन इटलीतील प्रसिद्ध पोषणतज्ञ डॉ.एम. मॅरागो यांनी केला होता.
  • तुम्ही फळं खात आहात का? फळं खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. परंतु, जेवणानंतर ते खाणं अतिशय चुकीचं आहे. यामुळे ना धड जेवण पचत ना फळं. म्हणून जेवणानंतर फळं न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
  • लगेच झोपू नका : तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेच झोपणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. कारण असं केल्यानं शरीरात चरबी जमा होते आणि वजन वाढते. शिवाय पचनाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर या उपक्रमांपासून दूर राहणे चांगले असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

ABOUT THE AUTHOR

...view details