महाराष्ट्र

maharashtra

By lifestyle

Published : 5 hours ago

ETV Bharat / health-and-lifestyle

तासन् तास बसून काम करता? रोज करा 'हे' आसन आणि रहा तणावमुक्त - Yoga Poses For Sitting Work

Yoga Poses For Sitting Work For All Day : बैठ्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांना पाठ, मान आणि कंबरदुखी सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. कामाच्या व्यापामुळे अनके लोकांचं स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष होत आहे. अशा लोकांसाठी आम्ही 10 मिनिटात करण्यासारखे योगासनं घेऊन आलोय. यामुळे तुम्ही तणावमुक्त जीनव जगू शकता.

Yoga Poses For Sitting Work For All Day
बैठ्या जीवनशैसाठी योगासनं (ETV Bharat)

Yoga Poses For Sitting Work For All Day:आजकालच्या बैठ्या जीनवशैलीमुळे बहुतांश लोकांना अनेक समस्यांचा सामना कारावा लागत आहे. ऑफिसकामासाठी अनेकांना तासन् तास लॅपटॉपसमोर किंवा कम्युटरसमोर बसून राहावं लागतं. कामाच्या व्यापामुळे आणि ताणामुळे अनेक लोक स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करतात. यामुळे पोट सुटणे, वजन वाढणे, पाठ-मान आणि कंबरदुखी वाढली आहे. अशा सगळ्यांसाठी काही व्यायाम अतिशय उपयुक्त ठरू शकतात. आम्ही कामाच्या व्यस्ततेमुळे वेळ न देवू शकणाऱ्यांसाठी काही योगासनं घेऊन आलो आहोत. हे योगासनं तुम्ही सहज करु शकता. नियमित 10 मिनिट स्वतःसाठी काढल्यास तुम्ही सुद्धा निरोगी जीवन जगू शकता.

वज्रासन :हे अतिशय सोप असं आसन आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमचे गुडघे वाकवून पायावर बसा. बसताना लक्षात ठेवा की तुमच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये थोडं अंतर असावं. त्यानंतर आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा. मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. आता आपलं संपूर्ण वजन पायावर ठेवा आणि विश्रांती घ्या. नियमित वज्रासन केल्यास बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन सारख्या समस्या दूर होतात. तसंच वजन कमी करण्यासाठी वज्रासन उपयुक्त आहे. तसंच वज्रासनामुळे महिलांमधील मासिक पाळीची अनियमितता दूर होते. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या देखील दूर होवू शकते.

बैठ्या जीवनशैसाठी योगासनं (ETV Bharat)

पद्मासन : डोक शांत ठेवण्यासाठी पद्मासन चांगल आहे. तसंच गुडघेदुखीपासून मुक्ती मिळवायची असेल तर पद्मासन फायदेशीर आहे. दिवसभर काम करणाऱ्यासाठी शरीरात उर्जा हवी असते. पद्मासन केल्यास शरीरातील उर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. पद्मासनामुळे मेंदूला चांगला रक्तपुरवठा होते. स्मरमशक्ती वाढते तसंच कामावर लक्ष केंद्रित होते. झोपेची समस्या असल्यास ते देखील कमी होते. पद्मासन करण्यासाठी मांडी घालून बसा. आता आपला डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आता दोन्ही हातांचे तर्जनी बोट अगठ्याच्या मधल्या रेषेवर ठेवा आणि हात गुडघ्यावर ठेवा. यानंतर डोळे मिटून 10 मिनिटे शांत बसा.

बैठ्या जीवनशैसाठी योगासनं (ETV Bharat)

अधोमुख श्वानासन : या आसनामुळे पोटाच्या आतल्या भागातील स्थायू मजबूत होतात. रक्ताभिसरण वाढते आणि चयापचय क्रिया सुरळीत होते. तसंच आपलं सपूर्ण अंग मोकळे होऊन स्ट्रेस कमी होतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथन तुम्ही गुडघ्यावर उभे राहा. यानंतर आपले दोन्ही तळहात जमिनीला टेकवा. जमिनीवर टेकलेले गुडघे हळूवार उचला. तळपाय आणि तळहात जमिनीला टेकलेले राहू द्या. अशी शरीराची पोझिशन किमान 30 ते 40 सेकंद ठेवा.

बैठ्या जीवनशैसाठी योगासनं (ETV Bharat)

ताडासन :सारखे एकाच स्थितीत काम केल्यानं मणक्याची समस्या उद्भवते. अशा वेळी मणक्याची हाडे मजबूत ठेवण्यासाठी ताडासन फायदेशीर आहे. सर्वप्रथम तुम्ही सरळ उभे राहा. दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवा. आता पायाची टाच उचला आणि पायाच्या बोटांवर उभे राहा. किमान 10 सेंकत या स्थितीत उभे रहा. यानंतर रिलॅक्स मोडवर या.

बैठ्या जीवनशैसाठी योगासनं (ETV Bharat)

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. चांगली झोप येण्यासाठी 'भूमध्यसागरीय आहार' फायेदशीर! - Mediterranean Diet
  2. मानदुखीच्या समस्येनं त्रस्त आहात? फॉलो करा तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स, मानदुखी होईल कमी - Neck Pain

ABOUT THE AUTHOR

...view details