मुंबई :2024 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवस उरले आहे. या वर्षामध्ये अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आली होती, यामधील बरीच चित्रपट हिट तर काही फ्लॉप झाली होती. 2023 प्रमाणेच 2024 हे वर्षही मनोरंजन आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या दृष्टीनं उत्तम ठरलं. चालू वर्षात 'हनुमान', 'कल्की 2898 एडी', ' फायटर', ' देवरा पार्ट 1', 'भूल भुलैया 3', 'स्त्री 2','सिंघम अगेन' आणि बरीच चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल झाली होती. 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2 द रुल' आहे. हा चित्रपट आता देखील बॉक्स ऑफिसवर खूप वेगानं कमाई करत आहे. 2024मध्ये अनेक बिग बजेट चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शित केली होती, यानंतर अनेकांचे पैसे देखील बुडाले होते. 250 कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या बॉलिवूड आणि साऊथच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- बॉलिवूडचे 250 कोटी बजेटचे फ्लॉप चित्रपट
'बडे मियाँ लहान मियाँ' : अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर मास ॲक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' 350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 59.17 कोटी कमाई केली होती, तर जगभरात या चित्रपटानं 102.16 कोटी रुपये कमावले होते. 'बडे मियाँ छोटे मियाँ' 2024चा फ्लॉप चित्रपट ठरला आहे.
'मैदान' : बॉलिवूड स्टार अजय देवगण अभिनीत स्पोर्ट्स फिल्म 'मैदान' हा 2024मधील फ्लॉप चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ यांनी केलं होतं. हा चित्रपट चालू वर्षाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं एकूण बजेट 250 कोटी रुपये होतं. 'मैदान'नं पहिल्या आठवड्यात 28.35 कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात 10.25 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 80 लाखांची कमाई केली. 'मैदान' चित्रपटाचं जगभरातील एकूण कलेक्शन 68 कोटी आहे. मैदान 'फ्लॉप' झाल्यामुळे निर्मात्यांना 150 कोटींहून अधिक रुपयांचा तोटा झाला.
- 2024 चे बॉलिवूडचे कमी बजेटचे फ्लॉप चित्रपट
क्रॅक- (बजेट 80 कोटी आणि कमाई- 12 कोटी)
जिगरा- (बजेट- 80 कोटी रुपये आणि कमाई- 23.60 कोटी)
खेल-खेल में- (बजेट- 100 कोटी आणि कमाई- 29.1 कोटी.)
सरफिरा- (बजेट- 100 कोटी आणि कमाई- 32 कोटी.)
मैरी क्रिसमस - (बजेट- 60 कोटी आणि कमाई- 12 कोटी.)
द बकिंघम मर्डर्स - (बजेट- 40 कोटी आणि कमाई- 7.53 कोटी.)
वेदा - (बजेट- 60 कोटी आणि कमाई- 25.93 कोटी.)