मुंबई Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'चा आता सातवा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात घरात नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. सहावेळा ठरलेला 'मिस्टर इंडिया', पाच वेळा 'महाराष्ट्र श्री'चा मानकरी ठरलेला संग्राम चौगुलेची वाईल्ड कार्ड एन्ट्री घरात झाली आहे. 'भाऊचा धक्का'वर शोचा होस्ट रितेश देशमुखनं रविवारी 8 सप्टेंबर रोजी संग्रामचं स्वागत केलं. आजच्या एपिसोडमध्ये संग्राम बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना दिसेल. आता संग्राममुळे घरातील वातावरणात नक्कीचं बदल होताना दिसेल. बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये संग्राम हा निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलबरोबर भिडताना दिसत आहे.
वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा संग्राम चौगुलेचा थरार : व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणतात, "या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे अपात्र आहेत." यानंतर संग्राम हा जादुई विहिरीत निक्कीला पडायला सांगतो. यावर नक्की ही तिच्या मेडिकल कंडिशनचं कारण देत विहिरीत पडायला नकार देते. यानंतर संग्राम हा निक्कीला जादुई विहिरीत ढकलतो. संग्रामनं पहिल्याचं दिवशी घरात आल्यानंतर निक्कीबरोबर पंगा घेतला आहे. आता व्हायरल होत असलेल्या प्रोमोवर अनेकजण आपल्या कमेंट्स देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "हेच तर पाहिजे होत, संग्रामनी पहिल्या दिवशीच मन जिंकल." दुसऱ्या एकानं लिहिलं, "कोल्हापुरी दणका." आणखी एकानं लिहिलं, "याला म्हणतात वाघ." या पोस्टवर अनेकजण फायर आणि हार्ट इमोजी शेअर करताना दिसत आहेत.