महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जान्हवी-राजकुमार यांनी 'मिस्टर आणि मिसेस माही'तील 'देखा तेनू' गाण्यावर दिली पहिली प्रतिक्रिया - Mr and Mrs Mahi - MR AND MRS MAHI

'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटातील जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्यावर चित्रीत झालेलं 'देखा तेनू' गाणं लॉन्च करण्यात आलंय. चित्रपटाबद्दलची भावना यामुळे उंचावली असल्याचं सांगण्यात येतं. गाण्याच्या लॉन्च प्रसंगी कलाकार, गीतकार आणि संगीतकारही हजर होते.

Janhvi-Rajkummar
जान्हवी-राजकुमार ((Photo: ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 4:51 PM IST

जान्हवी-राजकुमार ((Photo: ANI))

मुंबई- जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला 'मिस्टर अँड मिसेस माही' हा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जसजशी रिलीजची तारीख जवळ येत आहे, तसे निर्मात्यांनी या चित्रपटातील 'देखा तेनू' हे पहिलं गाणं लॉन्च केलं आहे. गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये प्रमुख कलाकार उपस्थित होते. यावेळी त्यांनी या रोमँटिक गाण्याबद्दलचे अनेक किस्से शेअर केले आहेत.

गाण्याबद्दलच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता, राजकुमार राव यांनी खुलासा केला की तो आणि जान्हवी लगेचच गाण्याच्या प्रेमात पडले. "आम्ही पूर्णपणे प्रेमात पडलो. लगेचच आम्ही गाण्याशी जोडले गेलो आणि आम्हाला ते सुंदर वाटले," असं तो म्हणाला. शाहरुख खानचा एक मोठा चाहता म्हणून, राजकुमार रावने या गाण्याबद्दल आपले कौतुक व्यक्त केले, हे गाणं 'कभी कुशी कभी गम' मधील 'शावा शावा' गाण्यातील आयकॉनिक मेलडीवर एक नवीन ट्विस्ट आहे. त्यांनी गाण्याचे निर्माते जानी आणि मोहम्मद फैज यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल अभिनंदन केलं.

जान्हवी म्हणाली, "तुम्हाला माहिती आहे की, आम्ही चित्रपटाचे शूटिंग करत असताना सुरुवातीला आमच्याकडं हे गाणं नव्हतं आणि आम्ही गाण्यातील कट व्हिज्युअल पाहत होतो." तिने पुढं सांगितले की जेव्हा दिग्दर्शक शरण शर्माने तिला या गाण्याची ओळख करून दिली, तेव्हा ते अखंडपणे व्हिज्युअलमध्ये बसत असल्यामुळे आणि चित्रपटाची एकूण भावना उंचावली. तिने फैजच्या भावमधुर आवाजाची आणि जानीच्या मार्मिक गीतांची प्रशंसा केली. जान्हवीचा विश्वास आहे की हे गाणे एक उत्कृष्ट नमुना आहे आणि त्यामध्ये सौंदर्य भावना जागृत करण्याची क्षमता यामध्ये आहे.

'देखा तेनू' हे गाणं एक रोमँटिक गाणं आहे जे जान्हवी आणि राजकुमार यांच्या पात्रांमधील ऑन-स्क्रीन रोमँटिक नातसंबंधाचा शोध घेणारं आहे. जानी यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मोहम्मद फैझ यांनं स्वरसाज चढवला असून 'शावा शावा' या मूळ जुन्या गाण्यातील काही आकर्षक ओळी नवीन गाण्यामध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे ते एक नॉस्टॅल्जिक परंतु आधुनिक अनुभव देणारं गाणं बनलंय.

'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये जान्हवी कपूर एका डॉक्टरच्या भूमिकेत आहे. यामध्ये तिला तिचा पती राजकुमार राव क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देतो. चित्रपटाचे शीर्षक दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला समर्पित आहे, ज्याला माही म्हणून ओळखले जाते. हा चित्रपट त्याच्या वारशाचा सन्मान म्हणून ही कलाकृती 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन'चं नवीन पोस्टर रिलीज - kartik aaryan
  2. विजयकांतना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर रजनीकांत झाला भावूक - Rajinikanth
  3. विकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वडील शाम कौशलनं शेअर केली भावनिक पोस्ट - vicky kushal birthday

ABOUT THE AUTHOR

...view details