मुंबई - 'मुफासा : द लायन किंग'च्या रिलीजला अवघे काही तास उरले आहेत. हा चित्रपट म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी ख्रिसमसपूर्व भेट आहे. चित्रपटात मुफासाचा एका अनाथ मुलापासून राजा म्हणून प्रसिद्ध होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. टिमॉन आणि पुंबा त्यांच्या खास शैलीत प्रेक्षकांना हसवणार आहेत. 'मुफासा: द लायन किंग' हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.
'मुफासा: द लायन किंग'ची कथा
'मुफासा: द लायन किंग' पाहण्याचे कारण म्हणजे याची कथा सिंह राजा असलेल्या एका मनोरंजक कथानकाचं यात चित्रण पाहायला मिळणार आहे. बॅरी जेनकिन्स दिग्दर्शित हा चित्रपट उत्कंठा साहसाचा अनुभव मिळण्याची खात्री देणारा चित्रपट आहे. सिंहाचं अनाथ मुल असलेल्या मुफासाचा पिल्लापासून ते राजा आणि एक हुशार सिंह बनण्याचा प्रवास खूप रंजक असणार आहे.
'मुफासा'मध्ये किंग खानसह दोन्ही मुलांचा आवाज
'मुफासा: द लायन किंग'चे सर्वात चर्चेत असलेले वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्टार-स्टडेड व्हॉइस कास्ट. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं मुफासाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मुफासाच्या व्यक्तिरेखेसाठी आवाज दिला आहे, तर त्याचा मुलगा आर्यन खाननं मुफासाचा मुलगा सिम्बासाठी आवाज दिला आहे. त्याचा धाकटा भाऊ अबराम यानंही बाल मुफासाला आवाज दिला आहे. अशा परिस्थितीत खान कुटुंबाचा आवाज एकत्र पडद्यावर ऐकणं ही एक खास पव्रणी असणार आहे. याशिवाय संजय मिश्रा यांनी पुंबा, श्रेयस तळपदे यानं टिमॉन आणि मीयांग चांग यांनी टका म्हणून आवाज दिला आहे. तेलगू व्हर्जनमध्ये महेश बाबूनं मुफासाचा आवाज दिला आहे, तर तामिळमध्ये अर्जुन दास मुफासाची भूमिका साकारत आहे.