मुंबई - मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच उद्योगपती वीरेन मर्चंट आणि उद्योजक शैला मर्चंट यांची धाकटी मुलगी राधिका मर्चंटशी लग्न बंधनात अडकणार आहे. गुजरात मधील जामनगर, येथे 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत विवाहपूर्व विधी पार पडणार आहेत. या भव्य इव्हेंटमधील अनेक अपडेट्स आणि व्हिडिओने इंटरनेट व्यापून गेले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचेचेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करणार आहे. याच्या लग्नापूर्वीच्या उत्सवाची सुरुवात 'अन्न सेवा'ने झाली. राधिका मर्चंटसह मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनी जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावातील रहिवाशांना पारंपारिक गुजराती जेवण दिले. राधिकाची आजी आणि आई-वडील वीरेन आणि शैला मर्चंट यांनीही 'अन्न सेवे'मध्ये भाग घेतला. पुढील काही दिवसांत सुमारे 51,000 स्थानिक रहिवाशांना अन्न वाटप केले जाणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या विधी सोहळ्यासाठी स्थानिक समुदायाचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी कुटुंबाने 'अन्न सेवा' आयोजित केली होती. जेवणानंतर पाहुण्यांना पारंपरिक लोकसंगीताची ओळख करून देण्यात आली. सुप्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.