महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ओटीटीवर सिक्वेल्सची रेलचेल, नव्या सीझनसाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला - sequels on OTT - SEQUELS ON OTT

sequels on OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवाहित होणाऱ्या वेब मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर त्याच्या सीक्वेलची प्रतीक्षा प्रेक्षक जरुर करतात. लोकप्रिया मिळणाऱ्या मालिकांचेच सीक्वेल बनतात हा अनुभव सार्वत्रिक आहे. आता 'द फॅमिली मॅन', 'मिर्झापूर', 'पाताल लोक', 'पंचायत' अशा मालिकेंच्या सीक्वेलची प्रतीक्षा प्रेक्षकांनी सुरू केली आहे.

Waiting for the sequels on OTT
ओटीटीवर सिक्वेल्सची रेलचेल

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 5:09 PM IST

मुंबई - sequels on OTT : गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्म्सना बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्स स्वतःचे शोज बनवत असतात आणि त्यातील काहींना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसादही मिळत असतो. चित्रपट हिट झाला की त्याचा सिक्वेल काढण्याची टूम निघाली असून डिजिटल शोज सुद्धा त्याची री ओढताना दिसताहेत. गेल्या काही वर्षांत 'द फॅमिली मॅन', 'मिर्झापूर', 'पाताल लोक' सारखे अनेक शोज प्रेक्षकांचे लाडके झाले. आता या सर्व शोजचे सिक्वेल्सही परतीच्या वाटेवर आहेत.


मनोज बाजपेयी अभिनित 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या दोन्ही सीझन्सना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. या शो मधील अंडर कव्हर एजंट श्रीकांत तिवारीची भूमिका मनोज बाजपेयीने साकारली होती आणि त्यांच्या सहकाऱ्याची, म्हणजेच जे के तळपदेची, भूमिका शरीब हाश्मी ने साकारली होती. या भूमिकेसाठी शरीब हाश्मीचे खूप कौतुक झाले आणि त्याला भरपूर काम मिळू लागले. या दोन्ही भूमिका पॉप्युलर तर झाल्याच परंतु प्रियामणीने श्रीकांत तिवारीच्या बायकोची भूमिका केली होती. या भूमिकेनंतर प्रियामणीही पुन्हा एकदा फॉर्मात आली आणि तिलाही हिंदीतील मोठे प्रोजेक्ट्स मिळू लागले. उदा. शाहरुख खानचा 'जवान', अजय देवगणचा 'मैदान' वगैरे. आता मनोज बाजपेयी च्या 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सिझन येऊ घातला असून लवकरच प्रदर्शनाची तारीख घोषित होणार आहे. 'द फॅमिली मॅन'च्या तीनही सीझन्सचे दिग्दर्शन राज आणि डिके यांनी केले आहे.



'मिर्झापूर' ही भारतातील आंतरीक भागातील राजकारण आणि गुन्हेगारी याच्यावर आधारित सिरीज आहे. आतापर्यंत याचे दोन सीझन्स झाले असून त्यात १९ भाग होते. आता तिसरा सिझन येत्या एप्रिल मध्ये तो प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल. पहिल्या भागात विक्रांत मासे आणि श्रिया पिळगावकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या परंतु त्या भागाच्या शेवटी त्यांची हत्या होते, असे दाखविल्यामुळे ते पुढील भागांत दिसले नाहीत. पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, रसिक दुग्गल, विजय वर्मा, श्वेता त्रिपाठी आदी मंडळी कथानक पुढे घेऊन जाताना दिसतील. याची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची असून
दिग्दर्शन गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी केले आहे.


'पाताल लोक' ही पोलिसी पार्श्वभूमी असलेली वेब सिरीज त्यातील वास्तविकतेमुळे प्रेक्षकांच्या मनात भरली. अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ कर्नेश शर्मा हा या मालिकेचा निर्माता होता. तो आता 'पाताल लोक'चा पुढील भाग घेऊन येण्यास सज्ज झालेला आहे. यातील मुख्य पात्र हाथिरामची भूमिका जयदीप अहलावत याने केली असून त्याच्याबरोबर ईश्वक सिंग अन्सारीच्या भूमिकेत आहे. 'पाताल लोक' च्या दुसऱ्या भागात हाथिराम कुठल्या गुन्हेगारी विश्वाचा छडा लावणार हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या मालिकेचे दिग्दर्शन अविनाश अरुण धावरे यांनी केलं असून गुल पनाग, तिलोत्तमा शोम महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसतील.

हेही वाचा -

  1. राणी मुखर्जीनं तिच्या 46व्या वाढदिवसानिमित्त पापाराझीबरोबर कापला केक, व्हिडिओ व्हायरल - Rani Mukreji 46th birthday
  2. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' ओटीटीवर प्रदर्शित - Fighter OTT Release
  3. Stri and Singham : 'स्त्री'चा दुसरा आणि 'सिंघम'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला! - Stri and Singham sequel

ABOUT THE AUTHOR

...view details