मुंबई - Virat Kohli and Anushka Sharma :क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नुकतेच दुसऱ्या मुलाचे पालक झाले आहेत. अनुष्कानं 15 फेब्रुवारीला लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. या जोडप्यानं सोशल मीडियावरून एका पोस्टद्वारे ते पालक झाल्याचं सांगितलं होतं. दरम्यान या जोडप्यानं आतापर्यत त्यांच्या मुलाची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. आता विराट हा मायदेशी परतला आहे, तर अनुष्का लंडनमध्ये तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. काही कारणमुळे विराट भारतात आल्याचं समजत आहे. विराट आणि अनुष्का आता आपल्या सुखी कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचा दावा रेडिटवर केला जात आहे.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल : एका यूजरनं लिहिलं आहे की, ''मी काय ऐकतोय, खरंच असं आहे का?'' याला उत्तर देताना एकानं लिहिलं, ''होय, तुमच्याकडे पैसा असल्यानं तुम्ही लंडनमध्ये शांततेनं आयुष्य जगू शकता, नागरिकत्वासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील आणि काही पैसेही खर्च करावे लागतील. याआधी अनुष्कानं सांगितलं होत की ती गृहिणी म्हणून राहणार आहे.'' आणखी एक युजरनं या पोस्टवर लिहिलं, ''मी विराट आणि अनुष्काला लंडनमध्ये पाहिले, त्यांना पाहून असे वाटते की, अनुष्काला लंडनमध्ये स्थायिक व्हायचा आहे.'' आता विराट कोहली आयपीएल खेळण्यासाठी भारतात आला आहे.