मुंबई -Vidya Balan On Movie Animal : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी चित्रपट 'दो और दो प्यार'मुळे चर्चेत आहे . आता सध्या विद्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान विद्यानं अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'बद्दल मोकळेपणानं बोलली आहे. हा चित्रपट डिसेंबर 2023मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 900 कोटींचा व्यवसाय केला. 'ॲनिमल' या चित्रपटाला खूप टीकेला सामोरे जावं लागलं होतं, मात्र एका मुलाखतीदरम्यानं विद्यानं 'ॲनिमल'च्या निर्मात्यांचं खूप कौतुक केलं आहे.
विद्या बालन केलं 'ॲनिमल' चित्रपटावर विधान : तिनं म्हटलं, 'जर ठोस कंटेंट योग्य प्रकारे सादर केली गेली नाही तर ते अपयशी ठरते, मात्र मेहनत केल्यानंतर आपले काम दिसते. कंटेंट सर्व काही असते. हा विश्वासाचा खेळ आहे. 'ॲनिमल' या चित्रपटात आशय चांगला नव्हता असे नाही.' विद्याला 'ॲनिमल' चित्रपटातील काही वादग्रस्त कंटेंटबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं म्हटलं, 'चित्रपटात वेगवेगळी दृश्ये तयार करण्यात आली आहेत, चित्रपट त्याच्या मूलभूत गोष्टींपासून मजबूत आहे. या चित्रपटानं एका क्षणासाठीही प्रेक्षकांपासून दूर केलं नाही. हा एक मनोरंजक चित्रपट आहे.' विद्याला 'ॲनिमल' खूप आवडला आहे. या चित्रपटाची कहाणी चांगली असल्याचं तिनं मुलाखतीदरम्यान सांगितलं.