मुंबई - बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रेमळ जोडप्यांपैकी एक असलेल्या विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडियावरील मजेशीर विचारांसह चाहत्यांना आनंदित केलं आहे. त्यांच्यातील मजेदार केमिस्ट्री आणि एकमेकांना कायम समर्थन देण्यासाठी ओळखलं जाणारं, हे जोडपं नातेसंबंधांचे ध्येय निश्चित करण्यात कधीही कमी पडत नाही. बुधवारी कतरिना तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विकीचा एक हलकाफुलका व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे.
कॅटरिनानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये, विकी आपल्या पत्नीचं मिश्किलपणे वर्णन करताना दिसत आहे. तो त्याच्या सध्याच्या छावा चित्रपटातील भाषेमध्ये कॅटरिनाबद्दल बोलताना दिसत आहे. तो व्हिडिओत पत्नीबद्दल मस्करीत म्हणतो, "विचित्र किंतु सत्य प्राणी है आप" याचा अर्थ "तू एक विचित्र पण खरी प्राणी आहेस." त्याच्या या विनोदी कमेंटमुळे आनंदित होऊन, कॅटरिनाने व्हिडिओला कॅप्शन दिलंय, "माझ्या प्रिय पतीचे माझ्याबद्दलचे वर्णन."
या जोडप्यानं त्यांचे स्पष्ट आणि क्रेझी संवाद शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कतरिना विकीबरोबर अनेक मजेदार क्षण शेअर करत असते. विकी कौशलही उघडपणे त्याच्या पत्नीच्या सौंदर्याचं आणि प्रतिभेचं कौतुक करताना कधीही थकत नाही. डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाल्यापासून हे जोडपं परस्पर आदर, प्रेम आणि सहवासाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या बिझी शेड्यूलमधूनही ते दोघं एकमेकांसाठी वेळ काढतात.