महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केला धमाका, जाणून घ्या 10व्या दिवसाची कमाई... - CHHAAVA BOX OFFICE COLLECTION

विकी कौशलच्या 'छावा'ची क्रेझ बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. हा चित्रपट सध्या प्रचंड वेगानं कमाई करत आहे.

chhaava movie
'छावा' चित्रपट ('छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Film Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 24, 2025, 12:40 PM IST

मुंबई - अभिनेता विकी कौशल अभिनीत 'छावा' चित्रपटाची जादू देशात पाहायला मिळत आहे. या चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात धमाकेदार कलेक्शन केलंय. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कहाणी प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होताना दिसत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवरच नाही तर जगभरातही हा चित्रपट खूप गाजत आहे. 'छावा'नं रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या सर्व चित्रपटाच्या मेहनतीवर विरजण टाकताना दिसत आहे. 'छावा'नं रिलीजच्या 10व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.

'छावा' चित्रपटाचं कलेक्शन : 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 33.1 कोटीची कमाई केली होती. आता ओपनिंग डेटपेक्षा 'छावा'नं दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटानं नवव्या दिवशी 44 कोटीची कमाई केली. यानंतर दहाव्या दिवशी 'छावा'नं 40 कोटी कमावले. 'छावा' चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 326.75 कोटींचा गल्ला जमा केला आहे. तसेच या चित्रपटाचं जगभरातील कलेक्शन 400 कोटीहून अधिक असेल, असा अंदाज लावल्या जात आहे. मॅडॉक फिल्म्स निर्मित हा चित्रपट लवकरच 500 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

'छावा' चित्रपटाबद्दल : 'छावा' या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे कौतुक सेलिब्रेटी आणि प्रेक्षक करत आहेत. विकी कौशलचा सर्वांधिक कमाई करणार चित्रपट 'छावा' ठरला आहे, त्यामुळे तो आता यशचा आनंद घेत आहे. हा चित्रपट सध्या रुपेरी पडद्यावर खूप वेगान कमाई करत आहे. या चित्रपटाची कहाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षक भावूक झाले आहेत. 'छावा' चित्रपट सर्वांधिक कमाई हा महाराष्ट्रामध्ये करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details