महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

स्त्रीनं जगभरात केली 500 कोटींची कमाई, विकी कौशलला होतोय 'त्या' गोष्टीचा पश्चाताप - vicky kaushal - VICKY KAUSHAL

Vicky Kaushal Stree : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हॉरर-कॉमेडी चित्रपटानं जगभरात 500 कोटीहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, आजही 'स्त्री' चित्रपट नाकारल्याचा पश्चाताप होत असल्याचा खुलासा विकी कौशलनं खुलासा केला आहे.

Vicky Kaushal Stree
विकी कौशल स्त्री (विक्की कौशल (IANS/Movie Poster))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 8:22 PM IST

मुंबई -Vicky Kaushal Stree :'स्त्री 2' चित्रपट हा आता देखील रुपेरी पडद्यावर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर विक्की कौशलनं एक मोठा खुलासा केला आहे. विक्कीनं खुलासा केला आहे की, 'स्त्री' फ्रँचायझी चित्रपटासाठी राजकुमार रावच्या आधी त्याला 'बिक्की'ची भूमिका ऑफर करण्यात आली होती. विकीला जेव्हा 'स्त्री'ची ऑफर मिळाला, तेव्हा त्यानं 'मनमर्जियां' हा चित्रपट साइन केला होता. 'मनमर्झिया' हा चित्रपट विकी कौशलच्या कारकिर्दीतील फ्लॉप चित्रपटांपैकी एक आहे. याशिवाय 'स्त्री' फ्रँचायझी ही बॉक्स ऑफिसवर हिट झाली आहे. 'स्त्री' फ्रँचायझीनं रुपेरी पडद्यावर कमाईचा नवा इतिहास रचला आहे.

विकी कौशलनं ऑफर का नाकारली? : विकी कौशलनं या चित्रपटाबाबत सांगितलं की, "स्त्री' चित्रपट सोडल्याचा मला अजूनही पश्चाताप होत आहे." त्यावेळी जेव्हा विकी कौशलनं 'स्त्री' नकार दिला. तेव्हा ती भूमिका राजकुमार रावकडे गेली. ' स्त्री' हा चित्रपट 2018 रोजी बनवण्यात आला होता. या चित्रपटाचा सीक्वेल सहा वर्षांनंतर आला आहे. 'स्त्री 2' चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलंय. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांनी या चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा अभिनयदेखील प्रेक्षकांना खूप पसंत पडला आहे.

'स्त्री 2'ची कमाई : 'स्त्री' चित्रपटात रुद्र भैयाची भूमिका पंकज त्रिपाठी, 'जाना'ची भूमिका अभिषेक बॅनर्जी आणि 'बिट्टू'ची अपारशक्ती खुराना केली आहे. 'स्त्री 2' या चित्रपटातील सरकटेची भूमिका, जम्मू-काश्मीर पोलिसांचा हवालदार सुनील कुमारनं केली आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका आपापल्या परीनं प्रेक्षकांना खूप हसवत आहे. 'स्त्री 2'नं दुसऱ्या वीकेंडपर्यंत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं होतं. या चित्रपटानं पहिल्या चार दिवसांच्या वीकेंडमध्ये 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि दुसऱ्या वीकेंडमध्ये 93 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटानं जगभरात 550 कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केलंय. त्याचबरोबर इंडिया फिल्मचं नेट कलेक्शन 400 कोटींच्या पुढे गेलंय.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं केला धमाका, 400 कोटीचा टप्पा पार - Stree 2
  2. 'द ग्रेट खली'पेक्षा उंच असलेल्या 'या' व्यक्तीनं 'स्त्री 2'मध्ये सरकटेची केली भूमिका - sunil kumar
  3. भारतीय सेलेब्सनं रक्षाबंधननिमित्त दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, पाहा पोस्ट - Raksha Bandhan 2024

ABOUT THE AUTHOR

...view details