महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ... - CHHAAVA TRAILER OUT

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत 'छावा'चा ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला आहे.

Chhaava Trailer
'छावा'चा ट्रेलर (Chhaava Trailer Out (Photo: Film Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 22, 2025, 5:41 PM IST

मुंबई :अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर पीरियड ड्रामा चित्रपट 'छावा' लवकरच रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. दरम्यान 20 जानेवारी रोजी 'छावा' चित्रपटातील विकी कौशलचं मोशन पोस्टर शेअर करण्यात आलं होतं. यानंतर 21 जानेवारी रोजी, या चित्रपटातील साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. आज 22 जानेवारी रोजी 'छावा' चित्रपटाचे निर्माते मडोक फिल्म्स यांनी ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूप दमदार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 14 फेब्रुवारी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाट पाहात आहेत. 'छावा' चित्रपटामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांचे पात्र साकारणार आहे.

'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज :'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विकी (छत्रपती संभाजी महाराज) हे युद्धभूमीवर शूत्रूबरोबर लढताना दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आता अनेक चाहत्यांना आवडत आहे. आता अनेकजण हा चित्रपट सुपरहिट होणार असल्याचं सोशल मीडियावर म्हणत आहेत. याशिवाय यापूर्वी या चित्रपटामधील टीझर देखील अनेक चाहत्यांना आवडला होता. 'छावा' चित्रपटाचा टीझरमध्ये विकी हा जबदस्त लूकमध्ये दिसला होता. 'छावा' हा मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असून, या चित्रपटामध्ये ॲक्शन सीन्स देखील चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (विकी कौशल) छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे.

'छावा' चित्रपटाबद्दल : 'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. 'छावा' चित्रपटाला संगीत संगीतकार ए.आर. रहमान यांनी दिलं आहे. चित्रपटाचे छायाचित्रण सौरभ गोस्वामी यांनी केलं आहे. दरम्यान विकी आणि रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट यापूर्वी 6 डिसेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार होता. मात्र यानंतर या चित्रपटाची डेट पुढं ढकलण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. 'महाराणी येसूबाईं'च्या भूमिकेतील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, 'छावा'च्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू
  2. विकी कौशल स्टारर 'छावा'चा ट्रेलर कधी होईल प्रदर्शित, जाणून घ्या तारीख...
  3. विकी आणि कतरिना कैफ विमातळावर झाले स्पॉट, नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज..

ABOUT THE AUTHOR

...view details