मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवरपॅक जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडप्याच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. आज 9 डिसेंबर रोजी या जोडप्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे जोधपूरमध्ये त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. जोधपूरमधून विकी आणि कतरिनाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. याशिवाय 8 डिसेंबर रोजी हे जोडपे मुंबईहून जोधपूरला रवाना झाले होते. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिना जोधपूर विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचा वाढदिवस :व्हिडिओमध्ये हे जोडपे हसत हसत विमानतळाच्या बाहेर, हातात हात घालून त्यांच्या कारच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये या जोडप्यानं हात पकडून पापाराझींना फोटोसाठी पोझ दिली. दरम्यान एअरपोर्ट लूकमध्ये विकीनं निळ्या रंगाचा डेनिम शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली होती. दुसरीकडे कतरिनानं यावेळी गुलाबी रंगाच्या सूट घातला होता. यावर तिनं लाईट मेकअप केला होता. याशिवाय तिनं या लूकला आणखी विशेष बनविण्यासाठी सनग्लास घातला होता. रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस खाजगी ठेवला आहे. विकी आणि कतरिना यांच्या लग्नाच्या वाढदिवसामध्ये त्यांचे कुटुंबीयही उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आता लावला जात आहे.