मुंबई - अमेझॉन वरील OTT मालिका ‘लव्ह स्टोरीयाँ’ च्या सहाव्या भागाची सुरुवात बंगालमधील दुर्गापूजेच्या सणाच्या उत्सवाने होते. यामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसलेल्या तरुणी कपाळावर मोठे कुंकू लेवून सिंदुर खेळताना दिसतात. यादरम्यान एका महिलेच्या आजावाजातील व्हाईस ओव्हर तिला लहानपणी असे खेळण्याच्या तिच्या इच्छेबद्दल सांगतो, पण मुलं सिंदुर खेळत नाहीत म्हणून तिला परवानगी नाकारली जाते. प्लॅशबॅकचा हा प्रसंग बदलून सद्य स्थितीत एक जोडपे बेडवरुन उठते आणि त्यांच्या दिनचर्येला सुरुवात करते. एपिसोडच्या काही मिनिटांत, आपल्याला जाणवते की हा आवाज तिस्ता दास या एका ट्रान्सवुमनचा आहे. जिला लहानपणापासूनच भेदभावाचा सामना करावा लागला. तिला प्रेम करण्यासाठी संघर्ष करावा लागला. ती तिच्या संक्रमणानंतर एका आत्मविश्वासू तरुण स्त्रीमध्ये रुपांतरीत झाली. कॉलिन डी'कुन्हा दिग्दर्शित ``लव्ह बियॉन्ड लेबल्स'' हा भाग, तिस्ता आणि दीपन चक्रवर्ती, या कोलकाता येथील ट्रान्सजेंडर जोडपे यांच्या रोमँटिक प्रवासाचा मागोवा घेतो. या जोडप्याच्या संघर्षाची कथा यात मांडण्यात आली आहे.
जोडप्याच्या आणि त्यांच्या प्रियजनांच्या वास्तविक जीवनातील मुलाखती, काही नाट्यरुपांतर आणि जोडप्यांनी स्वतः केलेल्या शक्तिशाली व्हॉईस ओव्हरच्या मिश्रणासह भाग पुन्हा तयार केले गेले आहेत. तथापि, वास्तविक जीवनात त्यांच्या एकत्र येण्याप्रमाणे, हा भाग रिलीज झाल्यावर पुन्हा अडचणीत आला. यूएई, सौदी अरेबिया, तुर्की, इंडोनेशिया आणि इजिप्तसह सहा देशांमध्ये या मालिकेवर बंदी घालण्यात आली होती. हा आक्षेप या LGBTQi+ जोडप्याच्या नात्याचे प्रदर्शन करत होता. हा पाथ ब्रेकिंग एपिसोड आणि असेच पाच भाग व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित झालेल्या मालिकेचा भाग आहेत.
'लव्ह स्टोरीयाँ' मालिका करण जोहर निर्मित आहे आणि सोमेन मिश्रा यांनी तयार केली आहे आणि सहा जोडप्यांच्या वास्तविक जीवनातील प्रेमकथा दर्शविणाऱ्या सहा दिग्दर्शकांचा समावेश यात करण्यात आला आहे. या असामान्य प्रेमकथा आहेत. यामध्ये समाज त्यांना विरोध करतो पण त्यांचे प्रेम काळाच्या कसोटीवर टीकून राहते.
सामान्य लोकांच्या असामान्य कथा - तुम्ही रोज पाहणारे लोक, तुमचे मित्र, तुमचे सहकारी यांच्या या कथा प्रिया रमाणी आणि समर हलर्णकर या पत्रकार दाम्पत्याने निलोफर व्यंकटराम यांच्या सहकार्याने बनलेल्या "इंडिया लव्ह प्रोजेक्ट'' नावाच्या प्रकल्पाचा भाग आहेत. इंडिया लव्ह प्रोजेक्ट हे एक व्यासपीठ आहे जिथे प्रदेश, धर्म, जात, लिंग या नियमांचे पालन करण्यास नकार देणारे लोक त्यांच्या प्रेमाच्या कथा शेअर करतात. कथा विलक्षण असल्या तरी या कथांमागील कथाही यामध्ये आहे. एका ज्वेलरी कंपनीला आंतरधर्मीय प्रेम दर्शविणारी जाहिरात मागे घेण्यास भाग पाडल्यानंतर ऑक्टोबरमध्ये इंडिया लव्ह प्रोजेक्ट सुरू करण्यात आला.
"ऑक्टोबर 2020 मध्ये, तनिष्कने आंतरधर्मीय प्रेमाचे वर्णन करणारी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्याने भारताला हादरवून सोडले होते. माझे पती समर हलर्णकर, आमची जवळची मैत्रीण निलोफर वेंकटरामन आणि मी या गुंडगिरीमुळे हैराण झालो ज्यामुळे कंपनीला त्याच्या प्रेमाच्या संदेशापासून मागे हटण्यास भाग पाडले. जात, धर्म, लिंग आणि वय या कठोर भारतीय नियमांच्या बाहेर प्रेम, सहवास आणि लग्न करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी आम्ही अनेक वर्षांपासून ऑनलाइन सुरक्षित जागेची योजना आखत होतो, सर्व काही पूर्णपणे घटनात्मक आहे. परंतु भारतीय पालकांना त्यांच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्यास परवानगी देणे किती कठीण आहे हे सर्वांनाच माहीत आहे. दागिन्यांची जाहिरात मागे घेण्यात आली तेव्हा आम्ही ठरवले की आम्ही ठरवले होते ती वेबसाइट तयार करण्यासाठी आम्ही थांबू शकत नाही," असे वरिष्ठ पत्रकार प्रिया रमाणी यांनी सांगितले.