मुंबई - Ankita lokhande : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी एक छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप झपाट्यानं व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या छोट्या पाहुण्याची झलक दाखविण्यात आली आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना देखील आवडला आहे. बी-टाउनमध्ये अनेक सेलिब्रिटींना मांजर आणि श्वानचं वेड आहे. अनेक सेलिब्रिटींकडे हे प्राणी आहेत. वरुण धवन, अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट आणि कपिल शर्मा यांच्याकडे हे पेट्स आहेत. आता अंकिता लोखंडे देखील कॅट मॉम बनली आहे.
अंकिता लोखंडेनं केला क्यूट मांजरीचा व्हिडिओ शेअर :अंकितानं आपल्या घरात एका मांजरीचे स्वागत केलं आहे. तिनं आपल्या सोशल इंस्टाग्राम पेजवर एका छोट्या मांजरीचा व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. क्लिपची सुरुवातीला अंकिताचा पती विकी जैन हा लिफ्टच्या बाहेर त्याच्या मांजरीची वाट पाहत असून तो हा क्षण त्याच्या फोनवर कॅप्चर करत आहे. यानंतर अंकिता ही टोपलीतून गोंडस मांजरीला बाहेर काढते. यानंतर दोघेही या मांजरीचा लाड करतात. अंकितानं या व्हिडिओत तिच्या गोंडस मांजरीबरोबर सुंदर क्षण दाखविले आहेत. अंकितानं आपल्या मांजरीचे नाव मौ लोखंडे जैन असं ठेवलं आहे.