मुंबई - Tumbbad:'तुम्बाड' पुन्हा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आपल्या भयावह आणि थ्रिलर कथेनं प्रेक्षकांना प्रभावित करून पुन्हा एकदा हा चित्रपट प्रसिद्धीझोतात आला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यानं पडद्यामागील फुटेज त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. निर्मात्यांनी आजीच्या परिवर्तनाचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड भितीदायक असल्याचा दिसत आहे. आजी चित्रपटामधील भयानक पात्रांपैकी एक आहे. दरम्यान हा व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'भीतीची ओळख, 'तुम्बाड' ही एका रात्रीमध्ये नाही बनली, बघा 'तुम्बाड'मधील आजी कशी तयार झाली.'
आजीचं थरारक अवतार :फुटेजमध्ये आजीचे भितीदायक रूप तयार करण्यासाठी घेतलेली मेहनत दिसून आहे. परिवर्तन प्रक्रियेत प्रोस्थेटिक्सचा वापर केला जात आहे. मेकअप आणि प्रोस्थेटिक्सचा प्रत्येक थर या भयंकर व्यक्तिरेखेला जिवंत करण्यासाठी टीमचे कठोर परिश्रम आणि कौशल्य प्रतिबिंबित करते. आजीचं हे लूक खरोखरच आश्चर्यकारक आहे. विशेष म्हणजे पांडुरंगची भूमिका साकारणारा हाच अभिनेता आजीची भूमिकाही साकारत आहे. यातून त्याची अद्भुत बहुआयामी प्रतिभा दिसून येते. 'तुम्बाड' 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. आनंद गांधी, राही अनिल बर्वे आणि आदेश प्रसाद दिग्दर्शित हा 2018 चा हिंदी भाषेतील हॉरर चित्रपट आहे.