महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मनोज बाजपेयींच्या 'सर्वोत्कृष्ट अभिनया'चे कौतुक करताना कंगना रणौतने उडवली 'नेपो किड्स'ची खिल्ली - कंगना रणौत

Kangana Ranaut on Nepo Kids : अभिनेत्री कंगना रणौतने मनोज बाजपेयी यांच्या विविध चित्रपटांमधील अभिनयाचे प्रदर्शन करणारी एक रील शेअर केली. मनोज बाजपेयी यांच्या अभिनय कौशल्यासाठी कंगनाने कौतुक केलं आहे. हे करत असतानाच तिनं नेपोटिझमवर निशाणाही साधला आहे.

Kangana Ranaut on Nepo Kids
कंगना रणौतने उडवली 'नेपो किड्स'ची खिल्ली

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 8:01 PM IST

मुंबई - Kangana Ranaut on Nepo Kids : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मनोज बाजपेयीच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केलं आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर मनोज बाजपेयीच्या चित्रपटांमधील विविध भूमिका दाखवणारे एक रील शेअर केले. इतर बॉलिवूड सेलिब्रिटींकडे नेहमी तिरकस नजरेनं समीक्षा करणारी कंगना 'नेपो किड्स'ला सर्वोत्कृष्ट कलाकार मानणाऱ्यांची थट्टा करत असते.

कंगना रणौतने उडवली 'नेपो किड्स'ची खिल्ली

सोमवारी, कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मनोज बाजपेयीची एक रील शेअर केली. त्याला कॅप्शन देताना तिनं लिहिलंय, "जेव्हा ते काही नेपोटिझमवाले त्यांच्या मुलांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणतात, तेव्हा त्यांना हे दाखवा आणि त्यांना सांगा, याला सर्वोत्तम अभिनय म्हणतात, पुढच्या आयुष्यात असा प्रयत्न जरुर करा. "

राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दौड' आणि 'सत्या' सारख्या चित्रपटातून मनोज बाजपेयी चमकला. त्यापासून ते 'गँग्स ऑफ वासेपूर'मधून दमदार पुनरागमन करण्यापर्यंतच्या त्याच्या विस्तृत फिल्मोग्राफीपर्यंत आणि 'द फॅमिली मॅन' सारख्या शोमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करून डिजिटल प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे वर्चस्व गाजवले आहे, त्याला जोड नाही. 'फॅमिली मॅन', 'गुलमोहर' आणि आता 'किलर सूप' यातील त्याच्या भूमिकाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. तो आपल्या करिष्म्यासह अशा काही भावना व्यक्त करतो ज्या आपल्याला त्याला वारंवार पाहण्यास भाग पाडतात. 'जोराम'मधील त्याच्या अलीकडील भूमिकेने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले आहे.

दुसरीकडे, कंगना सध्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. यामध्ये ती पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. 'इमर्जन्सी'मध्ये अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 14 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाची दिग्दर्शिका आणि निर्माती या दोन्ही भूमिकेत कंगना काम करत आहे. शिवाय, ती आगामी थ्रिलर चित्रपटासाठी तिचा 'तनु वेड्स मनू' सहकलाकार आर माधवनसोबत पुन्हा एकत्र येणार आहे.

हेही वाचा -

  1. पापाराझींवर भडकली रिया चक्रवर्ती, गमावला संयम
  2. 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या होम डेट नाईटला पाहता येतील असे रोमँटिक आणि हृदयस्पर्शी चित्रपट
  3. सलमान खान आणि निर्माता साजिद नाडियाडवाला ब्लॉकबस्टर ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र

ABOUT THE AUTHOR

...view details